एटीएममध्ये मागितली अनोळखी व्यक्तीची मदत; महिलेला हजारोंना गंडा

एटीएममध्ये मागितली अनोळखी व्यक्तीची मदत; महिलेला हजारोंना गंडा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एटीएमचा नवीन पिन कोड (ATM Pincode) जनरेट करण्यासाठी एटीएम मध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेणे एका महिलेला महागात पडले. त्यांच्या खात्यातून हजारो रुपये अनोळखी व्यक्तीने काढून अपहार केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना श्रीराम रोकडे (35,रा. फ्लॅट नंबर 4, अभंग अपार्टमेंट, नागजी चौक, नाशिक ) ह्या द्वारका येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर (दि.३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एटीएम कार्डचा नवीन पिनकोड जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी त्यांना एटीएममध्ये (ATM) असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मी तुमची मदत करतो असे भासवून रोकडे यांची नजर चुकवून त्यांच्या एटीएम ऐवजी दुसरे एटीएम त्यांच्या ताब्यात दिले व त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून २३ हजार १०० रुपये ही रक्कम काढून घेत अपहार केला.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी डी.बी.मोहिते करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com