नाशिकच्या सहा खेळाडूंना अटल युवा गौरव

नाशिकच्या सहा खेळाडूंना अटल युवा गौरव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील सहा खेळाडूंना अटल भारत स्पोर्ट्स ॲण्ड कल्चर असोसिएशन (Atal Bharat Sports and Culture Association) भोपाळच्या वतीने देण्यात येणारा अटल युवा गौरव पुरस्कार (Atal Yuva Gaurav Award) मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असल्याची माहिती बालाजी शिरफुले (Balaji Shirphule) यांनी दिली आहे....

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ भोपाळमधील २७ डिसेंबर रवींद्र भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गोतम, केंद्रीय मंत्री अखिलेश महाजन, कॅबिनेट मंत्री रघुराज ससाना, राज्यमंत्री जयवंत जाधव, अपंग आयुक्त संदीप रजक उपस्थित होते.

अटल जीवन गौरव अटल गौरव व अटल युवा या तीन प्रकारात पुरस्कार वितरण करण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये नाशिकच्या व्हिडिके स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऐश्वर्या वाळुंज, अर्चित मानकर, अखिलेश जतकर, पार्थ जाधव, जीत ठाकूर, श्लोक काटे यांचा समावेश आहे.

या खेळाडूंनी ६ वर्षाआतील, ८ वर्षा आतील व १० वर्षातील क्रीडा प्रकारात सातत्याने राज्यस्तरावर सलक ३ वर्ष उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या खेळाडूंना नाशिकच्या व्हिडीओ के स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संचालक आनंद काळे, बालाजी शिरफुले यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे सीएमसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. आ. राहुल आहेर, डॉ. दिनेश कराड, महेश थिटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com