नदीत नाही तर शेतात केले आईच्या अस्थींचे विसर्जन

दिंडोरी तालुक्यातील ओझे येथील कुटुंबियांचा आदर्श
नदीत नाही तर शेतात केले आईच्या अस्थींचे विसर्जन

ओझे | वार्ताहर Ojhe (Tal : Dindori)

निधनानंतर अस्थीविसर्जन नदीत केले जाते मात्र, ओझे येथे एका वृद्ध महिलेचे निधन झाल्याने त्यांचे अस्थीविसर्जन शेतात करण्यात आले. एक रोपटेदेखील याठिकाणी कुटुंबियांच्या वतीने लावण्यात आले.

अधिक माहिती अशी की, माजी पोलिस पाटील दिवंगत कारभारी गेणू निगळ यांची पत्नी अनुसया निगळ यांचे वयाच्या ८० वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

यावेळी निगळ कुंटूबाने आपल्या आईचे अस्थीविसर्जन रामकुंडात न करता आईचे संपूर्ण आयुष्य ज्या शेतात कष्ट करून गेले. त्यांच्या शेतात आपल्या आईचे अस्थीविसर्जन करायचे असा विचार केला.

त्यानंतर घरासमोरील शेताच्या बांधावर खड्डा खोदून त्यामध्ये विसर्जन करून वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षरोपनासाठी आंब्याच्या झाडाची निवड केली.

ओझे येथील निगळ कुटूंबातील सुदर्शन निगळ, प्रल्हाद निगळ व हरिष निगळ या तिघा मुलानी आपल्या आईचे अस्थीविसर्जन शेतात केल्यामुळे गावाक- यासह पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे.

Related Stories

No stories found.