नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

नाशिक इंडस्ट्रिज् अँण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या प्रशासक पदावर सहाय्यक धर्मदाय आयुक्त लिपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निमा गेल्या अनेक महिन्यांपासून सत्तेसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. या पदावर सहाय्यक धर्मदाय सहआयुक्त लिपटे यांच्यासोबतच धर्मदाय आयुक्त विभागाचे अधीक्षक झाडे व धुळे येथील अँड शिरोडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत. लवकरच प्रशासक या नात्याने निमाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतले जातील.