तिघांवर प्राणघातक हल्ला

तिघांवर प्राणघातक हल्ला

देवळा । प्रतिनिधी | Devla

शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने माजी सैनिक (ex soldier) असलेल्या भावासह, भावजयी व पुतणीवर कुर्‍हाड, कोयता व लोखंडी सळई अशा शस्त्रांनी हल्ला चढविल्याने तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

आज सकाळी मालेगाव (malegaon) रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. गंभीररित्या जखमी माजीसैनिकासह त्यांची पत्नी व मुलीस देवळाली (devlali) येथील लष्करी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

येथील मालेगांव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेत रस्त्याच्या वादातून माजीसैनिक असलेल्या मांगू रतन लोखंडे त्यांची पत्नी कल्पना व मुलगी माधुरी यांच्यावर त्यांचे बंधू संजय रतन लोखंडे त्याची पत्नी मनीषा, मुलगा सागर व प्रेम यांनी कुर्‍हाड, कोयते व लोखंडी सळईव्दारे हल्ला चढवत बेदम मारहाण (beating) केल्याने तिघे जण गंभीररित्या जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघा जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालयात (Rural hospital) प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक (nashik) येथे देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (Deolali Military Hospital) दाखल करण्यात आहे. याप्रकरणी माजीसैनिक मांगू लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

अधिक तपास सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ करीत आहेत. गंभीर जखमी मांगु लोखंडे हे तालुका आजी-माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कुटूंबावर झालेल्या हल्ल्याचा संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रविण बोरसे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com