जानोरी ग्रा.पं.कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला

जानोरी ग्रा.पं.कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला

कर्मचारी बेमुदत संपावर

जानोरी | वार्ताहर

जानोरी येथील ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचारी गटारीच्या चेंबरची सफाई करत असतांना मद्यधुंद अवस्थेत गावातील ज्ञानेश्वर वसंत केंग याने प्राणघातक हल्ला केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी संबंधितावर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी सुदेश खेराले व इतर दोन कामगार दुपारी वरचा कोळीवाड्यातील भूमिगत गटारीचे चेंबर साफ करीत असतांना येथील ज्ञानेश्‍वर वसंत केंग हा व्यक्ती विनाकारण कामात व्यत्यय आणीत होता. सदर इसमास कर्मचाऱ्यांनी समजावून सांगितले तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी त्याला समजावले परंतु सदर व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत सफाई कामगार यांच्या अंगावर धावून आला व सुरेश खेराले यांना मारहाण केली.

त्यावेळी सोबत असलेले कर्मचारी पुंडलिक चारोस्कर व भाऊराव केंग यांनी सोडवा सोडवी केली. त्यानंतर कर्मचारी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य अशोक केंग यांच्याकडे मदतीसाठी जात असतांना पुन्हा मागून हातात धारदार कोयता घेऊन सुरेश खेराले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशोक केंग यांनी मध्यस्ती केली.

त्यानंतर सदर कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात आले परंतु ग्रामविकास अधिकारी व सरपंच कार्यालयात नसल्याने त्यांना मोबाईल वर झालेला प्रकार कळविला. मात्र घटनास्थळी येणे शक्य नसल्याने सदर कर्मचारी दिंडोरी पोलीस ठाणे येथे रितसर फिर्याद दाखल केली असून जोपर्यंत सदर इसमावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कामगार काम बंद आंदोलन करत असल्याबाबतचे निवेदन उपसरपंच गणेश तिडके यांच्याकडे दिले. यावेळी संजय बोस, कर्मचारी श्याम खांबेकर, सुनील बोस, सुदेश खेराले, निलेश विधाते, प्रवीण चौधरी, समाधान बेंडकुळे, पुंडलिक चारोस्कर, योगेश रोंगटे, संगीता वेताळ आदी कर्मचारी उपस्थित होते.

आमचा सफाई कर्मचारी गटारीच्या चेंबरची सफाई करत असतांना विनाकारण मद्यधुंद अवस्थेत गावातील ज्ञानेश्वर केंग याने प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने मदत मिळाल्याने होणारा अनर्थ टळला. परंतु असे हे किती दिवस चालणार? तरी संबंधितावर गुन्हा दाखल केला असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कामबंद आंदोलन पुकारले आहे.

- संजय बोस, लिपिक, ग्रा.पं.जानोरी.

मी गटारीच्या चेंबरची सफाई करत असतांना कोणतेही कारण नसतांना विनाकारण दारू पिऊन ज्ञानेश्वर केंग याने माझ्यावर कोयता घेऊन हल्ला केला. परंतु जवळ इतर कर्मचारी असल्याने सुदैवाने बचावलो. तरी संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी व आम्हाला सुरक्षा द्यावी ही विनंती.

- सुदेश खेराले, फिर्यादी कर्मचारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com