दिंडोरीत आरक्षणानंतर इच्छुकांचा हिरमोड

दिंडोरीत आरक्षणानंतर इच्छुकांचा हिरमोड
दिंडोरी नगरपंचायत

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) स्थगित झालेल्या दिंडोरी (dindori), देवळा (deola), कळवण (kalwan), निफाड (niphad), या चार नगरपंचायतीतील 11 जागांसाठी आरक्षणाची (Reservation) सोडत जाहीर करण्यात आली.

त्यामुळे इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ लागल्याने या चार तालुक्यात पुन्हा रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र असे असले तरी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या दिंडोरी येथील दोन जागांची आरक्षण सोडत होऊन एक जागा महिलांसाठी राखीव झाली आहे.

गेल्या वेळी खुली असलेली जागा महिला राखीव झाल्याने येथील पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. येथील प्रभाग क्र. 11 व 16 ओबीसीसाठी राखीव होत्या. त्यातील प्रभाग 16 महिला राखीव जागा झाला होता. न्यायालयाच्या निर्दशानुसार प्रभाग खुले झाले. त्यातील एक जागा महिला राखीव करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) निलेश श्रिंगी (Nilesh Shringi) यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यात प्रभाग 11 महिला राखीव झाला.

प्रभागात यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना आता त्यांचे कुटुंबातील महिलेची उमेदवारी करावी लागणार आहे. या दोन्ही जागांसाठी अटीतटीच्या लढती रंगणार आहे नुकत्याच झालेल्या इतर प्रभागातील निवडणुकीचे पडसाद या प्रभागात पडणार असून शह काटशहांचे राजकारण रंगणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com