डांबरीकरण कामात गुणवत्तेला ठेंगा

ग्रामस्थांकडून निकृष्ठ कामाविरोधात तक्रार
डांबरीकरण कामात गुणवत्तेला ठेंगा

पळसन । वार्ताहर | Palsan

पळसन जवळील मेरदांड या रस्त्याचे डांबरीकरणाचे (Asphalting of the road) काम निकृष्ट दर्जाचे सुरु असून निव्वळ हातानेच रस्ता ग्रामस्थांनी उखडून दाखवून प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा रस्ता कामाच्या दर्जा विषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मेरदांड हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा (Mukhyamantri Gramsadak Yojana) असून रस्त्यांची अंदाज किंमत 127.22 लक्ष इतकी आहे. कार्यकारी यंत्रणा: कार्यकारी अभियंता, प्रधानमंञी ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन ग्राम विकास मंत्रालय तर्फे अर्थसंकल्पीय प्रकल्प रस्ता आहे. रस्ता झाला पण एक ते दोन दिवसातच रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या कामाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) व कळवणचे (kalwan) आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांच्या हस्ते झाले होते.

कार्यकारी अभियंता यांचेच कामाकडे दुर्लक्ष झाल्याने मेरदांड रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. किमान पावसाळा येईपर्यंत तरी टिकावे एवढीच अपेक्षा पळसन ग्रामपंचायतचे सदस्य भास्कर जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जाधव, चिंतामण वाघमारे, नामदेव पाडवी, प्रकाश जाधव, भागवत जाधव, लहाणु बार्‍हे, मधुकर वार्डे, नारायण वार्डे, अशोक लोखडे, चंद्रकात वाघमारे तसेच परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.

परंतु या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने एका रात्रीत केल्याचा आरोप होत आहे. डांबरा ऐवजी आईल ऑईल सारखे पाणी वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावरील धुळ न झाडताच रस्ता केला त्यामुळे डांबर रस्त्याला चिकटलेले नाही. त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्या संगनमताने हे काम निकृष्ट झाल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रस्त्यावरील धुळ न झटकताच त्यावरून डांबराचा लेप देण्यात आला आहे. खडीवरुन टाकलेला डांबराचा माल हा विस एम. एम थराचा पाहिजे होता. कर रुपाने मिळणारा पैसा हा आदिवासी जनतेला उपयोगात आला पाहिजे. निव्वळ आदिवासी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. केवळ ठेकेदाराच अशी निकृष्ट दर्जाची कामे करून पोसण्याचे काम सुरु आहे का. या कामात सुधारणा घडवून न आणल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणार आहे.

- एन. डी. गावित, आदिवासी विकास आघाडी प्रमुख

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com