श्री काळाराम मंदिरात अष्टौप्रहर स्वरहोत्र

आगळावेगळा उपक्रम : संगीत क्षेत्राकडून विविध रागांची स्वरसाधना
श्री काळाराम मंदिरात अष्टौप्रहर स्वरहोत्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्री काळाराम मंदिर संस्थानच्या ( Shri Kalaram Temple Trust )वतीने 1 जानेवारीला पहाटे साडेपाचपासून या स्वरहोत्राला ( Swarhotra )प्रारंभ होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेनुसार संपूर्ण दिवसाच्या 24 तासांतील 8 प्रहरात विविध थाटावर आधारित रागांची स्वरसाधना करण्यासाठी 'अष्टौप्रहर स्वरहोत्र' (Ashtauprahara Swarhotra )या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन, वादन आणि क‘थक नृत्यक्षेत्रातील नामवंत कलाकार आपआपली कला सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाची संकल्पना ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे यांची असून संयोजन श्री काळाराम संस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. दत्तप्रसाद (अजय) निकम करणार आहेत. तर निमंत्रक श्री काळाराम संंस्थानचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर व शुभम मंत्री तसेच समन्वयक म्हणून सी. एल. कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, समीर देशपांडे, मित्र जीवाचे फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश भोरे मोलाचे काम करत आहेत.

पंचवटीतील प्राचीन काळापासून असलेल्या श्री काळाराम मंदिर मंदिरात रविवार दि. 1 जानेवारी 2023 रोजी पहाटे 5.30 वाजेपासून ते मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम होणार असून भारतीय कालगणनेत संपूर्ण दिवसाचे म्हणजेच 24 तासांचे एकूण 8 प्रहर असून या आठही प्रहरात विविध रागांची स्वरसाधना करण्यात येते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेनुसार या अष्टौप्रहर स्वरहोत्र विविध थाटांवर आधारित रागांची स्वरसाधना या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला मैत्र जीवाचे फाऊंडेशनचे अविनाश बोडके, महेश महंकाळे, सुनील बोरसे, सचिन कोळपकर व अन्य विश्वस्त यांचे सहकार्य लाभले असून अष्टौप्रहर स्वरहोत्र कार्यक्रमात नाशिकमधील दिग्गज गायक, कलाकार, सृजन, रसिक आणि भक्त यांची मांदियाळी असणार आहे.

या सृजनांचे प्रयोजन, संकल्पन, आरेखन, नियोजन आणि निवेदन , सोबतीला काळाराम संस्थान यांचे आयोजन आणि नाशिकमधील कलाकारांचे समर्पण या त्रिवेणी संगमातून नाशिक शहरात एक नवीन कलासंस्कृती रुजू होत आहे. 1 जानेवारीला पहाटे 5:30 वाजताच्या काकड आरतीने मंगलमय वातावरणात सुरु होणारी अभिजात संगीताचे सूर त्यानंतर दिवसभर घुमणार असून रात्री उशिरापर्यंत ही मैफिल उत्तरोत्तर रंगत जाणार आहे.

निवेदन धनेश जोशी तर समन्वयक सी. एल. कुलकर्णी, समीर देशपांडे, गणेश गोरे तसेच कार्यक्रमासाठी विविध संस्था संघटनांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमात 125 कलाकार, 100 स्वयंसेवक, तसेच सुमारे 300 महिला, सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com