नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्याच्या आदिवासी विभाग विकास विभागानेही शालेय शिक्षण विभागा पाठोपाठ आता राज्यातील आश्रमशाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 फेब्रुवारीपासून हे वर्ग भरविण्यात येणार आहे.

यासाठी आदिवासी विभाग विभागाने एक आदेश जारी केला आहे. लॉकडाऊनंतर शालेय शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू केल्या. त्यावेळी नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.मात्र,आदिवासी विकास खात्याच्या आश्रमशाळांमध्ये हे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

शालेय शिक्षण खात्याने पाचवी ते आठवी चे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू केले.त्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग पंधरा फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागापेक्षा आश्रम शाळांची परिस्थिती अगदीच वेगळी आहे. बहुतांश शाळा निवासी स्वरूपात असल्याने प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना बसवताना काटेकोर काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार आदिवासी खात्याने आश्रमशाळांसाठी खास या सोपी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केली आहे.

शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम शाळा, एकलव्य निवासी निवासी शाळा, शासकीय वसतीगृह, नामांकित शाळांमध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांनी मुख्याध्यापकांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

50 टक्के क्षमतेचा निकष ठरणार अडसर

आश्रम शाळांमध्ये 50 टक्के उपस्थितीचा निकष पाळूनच फिजिकल डिस्टन्स पाळणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना निवासी ठेवताना तर जागेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणते विद्यार्थी निवासी ठेवायचे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना गावातूनच अप-डाऊन करायला सांगायचे ? असा प्रश्न निर्माण होणार आहे.