आशा वर्कर्सतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नाशिक

आशा वर्कर्सतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलांना त्वरित संरक्षण द्या या व इतर मागण्यांच्यासाठी राज्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक महिलांनी आंदोलन केले.

सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार आशा व चार हजार गट प्रवर्तक महिलांमध्ये करोन विषाणूचा प्रसार भयानक वाढत चालला आहेत.शेकडो आशा आज कोविड विषाणूमुळे बाधित आहेत .तरीही अनेक ठिकाणी या विषाणू बाधित आशा महिलांना सक्तीने दररोज काम करावयास लावले जात आहे.

करोना महामारीच्या काळामध्ये अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या सर्वच आरोग्य सेवकांना त्यांनी केलेल्या कामाचा पगार सुद्धा वेळेवर दिला जात नाही. म्हणून देशभर आंदोलने सुरू आहेत. तसाच अनुभव महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्याबद्दल आहे.

महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास खात्याकडून आदेश काढूनही प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत आशा व गटप्रवर्तक महिलांना प्रत्येक महिन्याचे एक हजार रुपये अद्यापही मिळाले नाहीत. तसेच नेहमीचा केलेल्या कामाचा मोबदला जो आहे तो मागील दोन महिन्यापासून मिळालेला नाही.

इतकेच नव्हे तर नुकतेच गाजावाजा करून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक आशा महिलेला दोन हजार मानधना मधील वाढ व गटप्रवर्तक महिन्यातील वाढ त्याचीही रक्कम एक ऑगस्ट रोजी मिळणे आवश्यक होते.

तीसुद्धा अद्याप मिळाली नाही.महिलांना दररोज तीनशे रुपये अतिरिक्त भत्ता मिळाला पाहिजे.

त्याचबरोबर महिलांना शासकीय सेवकांचा दर्जा मिळाला पाहिजे.त्यांना किमान वेतन तोपर्यंत महिलांना दरमहा एकवीस हजार रुपये अशा महिलांना 18 हजार रुपये मिळाले पाहिजेत.

याबाबत आंदोलन करून निवेदन देण्यात आले,अशी माहिती महाराष्ट्र आशा व गट प्रवर्तक संघटने अध्यक्ष राजू देसले यांनी दिली.

आज जिल्हा परिषद, मनपा नाशिक आयुक्त, जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले. तालुका, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांनाही निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी राज्य अद्यक्ष राजू देसले, माया घोलप, वैशाली कवडे, रेणुका जाधव, संगीता सुरंजे, अर्चना वाघ आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

1) करोना महामारीमध्ये सर्व्हेचे काम करणाऱ्या आशा, व गट प्रवर्तक ना 1 मार्च 2020 पासून करोना संपेपर्यंत आरोग्य सेवकाप्रमाणे मागील फरकासहित दररोज 300 रु. अतिरिक्त भत्ता मिळावा.

2) आशाना दरमहा 18 हजार रुपये किमान वेतन, लागू करा, गट प्रवर्तक ना 21 हजार रुपये वेतन द्या.

3) आशा व गट प्रवर्तक वर हल्ले करणाऱ्या वर कठोर गुन्हे दाखल करा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com