
उमराणे | वार्ताहर | Umrane
वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते हिरामण पंढरीनाथ देवरे (वय 69) हे नाशिक (nashik) येथे आठ दिवसापासून खाजगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) उपचार घेत होते. आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (heart attack) निधन झाले.
सदर वृत्त उमराणे (umrane) येथे घरी पत्नी विमलबाई देवरे (वय 64) यांना कळविण्यात आले. पतीच्या दुःखद निधनाचे वृत्त कळताच दुःख अनावर होऊन विमलबाई देवरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (heart attack) आला व पती निधनानंतर अवघ्या एका तासातच विमलबाई देवरे यांचेही निधन झाले.
शोकाकुल वातावरणात उमराणे येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पछात 2 मुले, मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. ह्या घटनेने उमराणे गावात व परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे