देशातील सर्वात उंच ध्वज नाशकात; वाचा 'कुठे'

देशातील सर्वात उंच ध्वज नाशकात; वाचा 'कुठे'

कळवण । प्रतिनिधी Kalwan

खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वजाची (tallest flag) प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वज यात्रेचे (Swarajya Dhwaj Yatra) सप्तशृृंंगीगडावर (Saptashrungi Gad) आगमण झाले. या यात्रेचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पहिल्या पायरीवर पूजन करून दर्शन घेत ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी ध्वज पूजा करुन यात्रेचे स्वागत केले. यात्रेचे प्रमुख स्वराज्य रथ सेवेकरी ऋषिकेश करभाजन, नाना गवळी यांचा यावेळी यांचा सत्कार करण्यात आला. जयघोष करत स्वराज्य ध्वजाची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व ग्रामस्थांनी ’स्वराज्य ध्वजा’ची पूजा केली.यावेळी राजेश गवळी, संदीप बेनके,अजय दुबे,दीपक जोरावर, शांताराम गवळी, शांताराम सदगीर,गणेश बर्डे, प्रवीण दुबे, तुषार बर्डे, वैभव धुमसे, रोहित आहिरे, वसंत साळुंखे, दिलीप बर्डे, विजय दुबे, मधुकर गवळी जुगल उपाध्ये, रमेश पवार, योगेश कदम, ईश्वर कदम, राहुल पोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, देवीमंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

74 ठिकाणी ध्वज जाणार

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वज उभारला जात आहे. लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध 74 प्रमुख आध्यात्मिक, धार्मिक ठिकाणे तसेच संतपीठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी ध्वज नेण्यासाठी स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या खर्डा येथील किल्ल्याच्या आवारात दसर्‍याच्या दिवशी स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com