तब्बल दोन वर्षांनंतर लालपरीचे आगमण

तब्बल दोन वर्षांनंतर लालपरीचे आगमण

देवगाव | वार्ताहर | Devgaon

करोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेली लालपरी (ST) अखेर देवगावमध्ये अवतरल्याने यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे वाहक, चालक यांचा सत्कार करण्यात आला...

देवगाव परिसरातील (Devgaon Area) नागरिकांसह चाकरमानी, विद्यार्थी यांना नाशिकला ये-जा करण्यासाठी अनेक वर्षांपासून देवगाव ते नाशिक ही बससेवा (Bus Service) सुरू होती. मात्र करोनामुळे (Corona) बसगाड्या बंद करण्यात आल्या होत्या.

मात्र आता करोना प्रादूर्भाव कमी होताच बस कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उगारले. परिणामी लालपरीची चाके आणखी खोल रूतली. आता या कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याने तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाशिक ते कानळद ही बस देवगाव मार्गे सुरू झाल्याने व ही बस देवगावमध्ये येताच बसचे वाहक व चालक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी देवगावचे माजी सरपंच विनोद जोशी (Vinod Joshi), मा.पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे (Bhausaheb Bochare), पांडूरंग कुलथे, राजेंद्र लोहारकर, योगेश कुलथे, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, भाऊ सोमवंशी, राजू कादरी, हरूण कादरी, अमोल कुलथे, उमेश राजगुरू, आशिष बोचरे, अर्णव कुलथे आदींसह रूई, देवगाव, कानळद परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.