Photogallery : आला आला वारा... संगे पावसाच्या धारा

मान्सून जिल्ह्यात दाखल
Photogallery : आला आला वारा... संगे पावसाच्या धारा

नाशिक | Nashik

मोठ्या आतुरतेने सर्वजण ज्या मॉन्सुनच्या आगमनाची वाट पहात होते, तो मान्सुन जिल्ह्यात दाखल झाला आहे. पहाट पासुन पावसाने हजेरी लाऊन लवकरच धो धो बरसण्याचे संकेत दिले आहेत.

आज शहरात ढग भरुन येत होते. वादळी वारे वाहुन मोठा पाऊस होईल असे वातावरण तयार होत होते. मात्र मध्येच उन पावसाच्या खेळाचे दर्शन झाले. सातपुर, सिडकोत दोन वेळा थोड्या थोड्या अंंतराने चांगला पाऊस झाला. नाशिकरेड येथे यंदाचा प्रथमच एक तास जोरदार पाऊस झाला. जेलरोड, सिन्नर फाटा, शिंदे, पळस या भागात रस्ते जलमय झाले होते. मृग नक्षत्रातील पावासाच्या आगमानाकडे बळीराजा आतुरतेने पाहत होता.

ती प्रतीक्षा आज काही अंशी फळास आली. शहरात तुरळक पाऊस होत असला तरी त्रंबक, इगतपुरी,पेठ, सुरगाणा या पावसाच्या माहेरघर असलेल्या तालुक्यात खेडया पाडयांंवर पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे.

काल सायंकाळ पासुन जिल्ह्यात हवेतील दमटपणा कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे. पावसाला पोषक वातारवरण आहे. एक ते 17 जुन पर्यंत पर्यंत नाशिक जिल्ह्यात सरासरी 83 मिली मिटर पाऊस झाला आहे. काल पासुन हवेतील दमटपणा कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे. पावसाला पोषक वातारवरण आाहे.

या आठवड्यात सर्वत्र पाऊस समााधानकारक झाल्याास महीना अखेरीस खरीप पेरण्यांना वेग येऊ शकेल. गुरुवारी जिल्ह्यात इगतपुरीत 38, पेठला सहा, त्रंबकेश्वरला 13, सुरगाण्यात 1.3 मिलीमिटार पाऊस झाला. इतर तालुक्यात पाऊस नव्हता.

निसर्गाची साथ यंदा चांगली मिळणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत असले तरी ‘मोठयाा कष्टाने पिक वीलेल्या शेेतमालाला रास्त भाव मिळाला तर चांगल्या पावसाचे समाधान मिळेल, शेत मालाला मातीेमोेल बाजारभाव मिळाल्याास कि तीही चार्ंगले पाऊस झाला तरी ‘शेतक ऱयांच्या आनंदावर विरजन पडल्या शिवाय राहत नाही. म्हणुन रास्त भावाचेही नियोजन होणेे गरजेचे आहे. -रामनाथ ढिकले, सैय्यद पिंंप्री

यंदा दहा दिवस अगोदर थोडा पाऊस झाल्यााने जमीनीत ओलावा निर्माण झाला . खरीप पेरण्या वेळेत होण्यास त्यामुळे मदत होणार आाहे. या महीन्यात चार्ंगला पाऊस झाल्याास खेरीप हंगाम चांंगला जाईल.

- सुजाता मााळोदे, शेतकरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com