
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
दि. १८ जानेवारीपासून त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा आहे. संत निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ यात्रेला वारकरी येत आहे. दिंड्यांच्या आगमनाने त्रंबक नगरी गजबजली आहे.
मंदिरात मुख दर्शन करणाऱ्या दिंडीचे स्वागत संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले. दिंड्यांचे स्वागत ट्रस्टचे पदाधिकारी निलेश गाढवे, सोमनाथ घोटेकर यांनी केले.
त्र्यंबकेश्वर मंदिर आवारात दिंडी प्रदक्षिणा करून बाहेर पडेलम, अशी सुविधा करण्यात आली आहे. अनेक दिंड्या कुशावर्त तीर्थ तेथे वंदन करून संत निवृत्तीनाथ मंदिराकडे रवाना होत आहे.