ऑनलाईन रोलेट खेळवणारे जेेरबंद

भद्रकाली पोलिसांची कारवाई
ऑनलाईन रोलेट खेळवणारे जेेरबंद

नाशिक | Nashik

मोबाईलवरील फनगेम (Mobile Fungame) नावाच्या अ‍ॅपद्वारे रोलेट जुगारासाठी (Roulette Jugar) पॉइंट व आयडी पुरवणारे व इतरांना जुगार खेळवणार्‍या दोघांना भद्रकाली पोलीसांनी (Bhadrakali Police) जेरबंद केले. त्याच्याकडून 5 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिद्धांत गुलाबराव शिराळ व मनोज बैरागी (24, रा. पंचशीलनगर, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पंचशीलनगर मधील (Panchashilnagar) खंडेराव मंदिराशेजारी रस्त्याच्या कडेला रोलेट जुगारासाठी पॉइंट तसेच आयडी देणारे संशयित बसले असल्याची माहिती पोलीसांना मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल व 5 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाय.एस. पाटील करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com