नाशिक । Nashik

नियंत्रण कक्ष येथे फोन करून महिला अधिकार्यास अपशब्द बोलून त्रास देणार्या संशयिताचा कोणताही पुरावा नसताना त्यास जेरबंद करण्याची कामगिरी सरकारवाडा पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने केली.

संतोष तुकाराम खिळले (54, रा. पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याविरुद्ध कलम 186,509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून अनोळखी दुरध्वनीद्वारे एक व्यक्ती शहर नियंत्रण कक्षास कॉल करून तेथील महिला अधिकार्यांना वाईट बोलून त्रास देत होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सबंधीत व्यक्तीचा तांत्रिक बाबींद्वारे पत्ता शोधून त्याचा शोध घेतला असता, तो काही वर्षांपूर्वी नमूद पत्त्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. तो फिरस्ता असून त्याचे घरदार, कुटुंब नाही असे पोलीसांना समजले. अखेरीस त्याला ओळखणारा एक सुरक्षा रक्षकास घेऊन त्याचा, लोकेशन वरुण शोध सुरू केला असता सबंधीत व्यक्ती पाथर्डी परिसरात आढळून आला.

त्याची ओळख पटवून पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता तो हमाली काम करतो, मिळेल तेथे झोपतो, दारूचे वेसन जडले असून तो 100 क्रमांकावर कॉल तसेच नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर कॉल करून अधिकार्यांना त्रास देत होता. त्यास सरकार वाडा गुन्हे शोध पथकाने शिताफिने अटक केली या कर्मचार्यांचा सहायक पोलीस आयुक्त दिपाली शर्मा यांनी पुष्प देऊन सत्कार केला.