कट्ट्यासह जिवंत काडतुस बाळगणारे जेरबंद
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने (Crime Branch Unit No.1) तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस (live cartridge) हस्तगत केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गुन्हे शाखा युनिट क्र. १ यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकेश सोळंकी नावाच्या मुलाने गेल्या महिन्यात राजस्थान (Rajasthan) येथून देशी बनावटीचे पिस्तोल (pistol) आणले असल्याचे समजले.
त्यांनी हि माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (Senior Police Inspector Vijay Dhamal) यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश फुआरामजी सोळंकी (20,रा. भाभानगर, नाशिक) याच्याकडे असलेल्या अवैध देशी बनावटीच्या पिस्तोल बाबत विचारपूस केली असता त्याने जोधपुर (Jodhpur), राजस्थान येथुन एक गावठी पिस्तोल व ०१ जिवंत काडतुसे असे सचिन राजेंद्र अंधारे (37,रा. गुरुकृपा बंगला नं. १ शिक्षक कॉलनी, धात्रक फाटा, नाशिक) याच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगीतले.
त्यावरून त्याचा शोध घेवून तो मिळुन आल्याने त्यास वरील नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी अवैध देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुस बाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुस त्याचा मित्र मंगेश अरुण कोथमिरे (34,रा. सुर्यवंशी चाळ, अमृतधाम पंचवटी, नाशिक) याच्याकडे ठेवण्यास दिले असल्याचे सांगीतले. त्यावरून त्याचा शोध घेवुन त्यास विचारपूस केली असता त्याने सदरचे देशी बनावटीचा कट्टा व ०१ जिवंत काडतुस असे त्याच्या घरात लपवुन ठेवल्याचे सांगुन त्याने ते काढून दिले. याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.