सिन्नर : गणेश मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

सिन्नर : गणेश मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

गणेश मुर्ती विर्सजनाऐवजी (Ganesha idol immersion) नगरपरिषदेने मुर्ती संकलनाचा उपक्रम (Idol collection activities) गेल्या वर्षापासून सुरु केला आहे. यंदाही शहरात मुर्ती व निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी 20 ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहमी प्रमाणे सिल्वर लोटस स्कुलच्या प्रांगणातील तरण तलावही मुर्ती विर्सजनासाठी सज्ज झाला आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी (Environmental protection) पाण्यात मुर्ती विर्सजित करु नये व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर (corona infection) गर्दी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्रे उभारली आहेत. दरवर्षी गणेश भक्त सरदवाडी धरण, गावाबाहेरील सरस्वती नदी पात्र व कुंदेवाडी परिसरातील देवनदी पात्रात मुर्ती विसर्जित करत होते. मात्र, यंदा पाण्याअभावी येथे मुर्ती विसर्जन करणे अशक्य होणार आहे.

यामुळे पाण्याचे प्रदुषणही (Water pollution) मोठ्या प्रमाणावर होत असते. हे टाळण्यासाठी नगरपरिषद सज्ज झाली असून नदीपात्राकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर मुर्ती संकलन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सरदवाडी रोड परिसर, गावाबाहेरील देवी रोड परिसर, संगमनेर नाका, कुंदेवाडी, सुर्योदय संकुल, शिवाजीनगर, चौदा चौक वाडा, उगले लॉन्स, डुबेर नाका, घोटी महामार्ग, नवीन कोर्टाजवळ नगरपरिषदेकडून मुर्ती व निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नदीपात्रात, धरणात मुर्ती विर्सजन न करता मुर्ती जमा करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

भाविकांनी मुर्ती पाण्यात विसर्जित न करता नगर परिषदेच्या संकलन केंद्रात मुर्ती जमा कराव्यात. मागील वर्षी 4 हजार गणेश मुर्तींचे संकलन झाले होते. यावर्षीही 5 ते 6 हजार मुर्ती संकलन होण्याची अपेक्षा आहे. नदी पात्रात किंवा धरणात मुर्ती विर्सजन करण्यावर बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करावे.

- किरण डगळे, नगराध्यक्ष

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com