नाशकात रुग्णांसाठी ५ हजार खाटांची व्यवस्था
नाशिक

नाशकात रुग्णांसाठी ५ हजार खाटांची व्यवस्था

४७ रुग्णालयात २९५८ खाटा आरक्षित ; शिल्लक खाटा १४४०

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील रुग्णांचा आकडा १० हजाराजवळ पोहचला आहे. वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत मनपा प्रशासनाकडुन आता कोविड रुग्णांसाठी ५ हजारापर्यत खाटांची व्यवस्था केली आहे. आजमितीस शहरात ४७ रुग्णालयात महापालिका २ हजार ९५८ खाटा आरक्षित असुन १४४० खाटा शिल्लक आहे. यामुळे रुग्णांचा आकडा वाढत असला तरी महापालिका प्रशासनाकडुन पुरेशा खाटा तयार करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.

शहरात करोना बाधीत रुग्णांच्या संंपर्कात आलेले कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडुन पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने शहरातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसात नवीन रुग्णांचा आकडा १हजार ३८६ इतका झाला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. चाचणींच्या माध्यमातून आता करोना सदृश लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ संशयित रुग्ण म्हणुन रुग्णालयात दाखल केले जात आहे. यामुळे संशयित मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.

बाधीत रुग्णांच्या संपर्कातील संशयितांवर उपचारासाठी महापालिकेने ७ कोविड केअर सेंटर मध्ये १२२० खाटा उपलब्ध करुन दिल्या आहे. आता रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत महापालिकेकडुन ५ हजार खाटांची व्यवस्था केली जात असुन यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com