बस स्थानकावरुन तब्बल साडेपंधरा तोळे सोने लंपास

बस स्थानकावरुन तब्बल साडेपंधरा तोळे सोने लंपास

सिन्नर। वार्ताहर | Sinnar

येथील बसस्थानकात (bus stop) बसमध्ये (bus) चढत असताना महिलेच्या पिशवीतील सुमारे साडेपंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Gold ornaments) अज्ञात चोरट्याने (thief) लंपास केल्याची घटना घडली.

बसस्थानकातून महिलांचे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकातून गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रमाबाई कॉलनी, घाटकोपर (Ghatkopar), मुंबई (mumbai) येथील विमल पांडुरंग आंधळे ही महिला दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास लासलगाव (lasalgaon) बसमध्ये चढत असताना

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीमध्ये ठेवलेले सुमारे सव्वापंधरा तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. घटना लक्षात येताच महिलेने सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) चोरीची फिर्याद दिली.

अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील 40 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 40 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 40 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ आणि 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे साडेपंधरा तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. सदर महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी (police) चोरट्यांच्या विरोधात सुमारे 2 लाख 32 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com