
जळगाव नेऊर | प्रतिनिधी Jalgaon Neur
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जळगाव नेऊर ता.येवला येथील भूमिपुत्र रतन राजाराम गुळे (वय ३५) यांचे मुंबई येथे अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतांना शहीद झाले. नाशिक आर्टीलरी सेंटर सैनिकी दवाखान्यात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते.उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
नाशिक येथे एक वर्षांपासून आर्टीलरी सेंटर मध्ये कार्यरत होते. नाशिकला पत्नी सुनिता गुळे यांचेसोबत ते राहत होते. सैन्यदलात पंधरा वर्ष सेवा पुर्ण झाल्यानंतर तीन वर्षे सेवा वाढवून घेतली होती.जळगाव नेऊर व पंचक्रोशीत सैनिकाच्या निधनाची बातमी समजताच हळहळ व्यक्त केली. कुटुंबात वडील राजाराम गुळे,भाऊ गोरख गुळे व सुनिल गुळे आदी परिवार आहे.
शुक्रवार दि.९ जून २०२३ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान जळगाव नेऊर येथील गुळे वस्तीवर अंत्यसंस्कार होणार आहेत .त्यापूर्वी जळगाव नेऊर गावात मानवंदना देण्यात येणार आहे.