नांदूर शिंगोटेत सशस्त्र दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

नांदूर शिंगोटेत सशस्त्र दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक | Nashik

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) नांदूरशिंगोटे (Nandur Shingote) येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीन घरांवर चोरट्यांनी सशस्त्र दरोडा (Robbery) टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदूरशिंगोटे येथील रहिवासी संतोष गंगाधर कांगणे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यावेळी कांगणे यांच्या आई रतनबाई या हॉलमध्ये नातवंडासोबत झोपलेल्या असतांना चोरट्यांनी रतनबाई यांच्या मानेला चाकू (Knife) लावत शांत बसा आणि अंगावर असलेले दागिने (Jewelry) काढून द्या असे म्हणत सर्व दागिने काढून घेतले.

त्यानंतर चोरट्यांनी गंगाधर कांगणे यांच्या रूमकडे जात त्यांना झोपेतून उठवून काठीने मारहाण केली. तसेच तुमच्याकडे जी काही रक्कम असेल ती काढून द्या असे म्हणत चोरट्यांनी कांगणे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये रोख रक्कम व दहा तोळे दागिने नेले.

यानंतर चोरट्यांनी ( Thieves) संतोष कांगणे यांच्या रूमचा दरवाजा लावल्यानंतर कांगणे यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कांगणे यांची मुलगी शुभ्रा हिने दरवाजाची कडी उघडली. त्यावेळी संतोष कांगणे बाहेर आले असता त्यांच्यासमोर सहा ते सात चोरट्यांनी हातामध्ये लाठ्याकाठ्या, कुऱ्हाड, कोयता, लोखंडी पहार, अशी शस्त्र घेऊन उभे बघितले.

त्याचवेळी चोरट्यांना विचारणा केली असता त्यांनी कांगणे यांना मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी रमेश लक्ष्मण शेळके यांच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळविला असता त्याठिकाणी सुद्धा दरोडेखोरांनी इंदुबाई शेळके यांच्या कानातील सोन्याचे टॉप्स चोरून नेले आहेत.

तसेच या घटनेनंतर नांदूरशिंगोटे गावचे अनेक नागरिक व पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. पंरतु तोपर्यंत चोरटे या ठिकाणावरून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी (Police) संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र काही हाती लागले नाही. तसेच सकाळी सात वाजेपासून नांदूर शिंगोटे येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, यावेळी सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुटकुळे, एमआयडीसी पोलीस निरीक्षक चौधरी आणि भावी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर उपस्थित होते. तर घटनास्थळी पोलीस यंत्रणेने डॉग स्पॉट व ठसे तज्ञ यांना पाचारण केले असून पुढील चौकशीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com