संवेदनशील भागात सशस्त्र पोलिस संचलन

रस्त्यावर अजान, नमाज पठणाला बंदी : खांडवी
संवेदनशील भागात सशस्त्र पोलिस संचलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गत महिन्यात मालेगाव बंद (malegaon bandh) दरम्यान घडलेल्या हिंसक घटना (Violent incident) लक्षात घेत उद्या सोमवार दि. 6 डिसेंबररोजी बाबरी मशिद (Babri Masjid) पतन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा (Police system) सतर्क झाली आहे.

संपुर्ण शहरात संवेदनशील भागात (sensitive areas) बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आज सायंकाळी सशस्त्र पोलिसांनी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) यांच्या नेतृत्वाखाली शहरात संचलन करीत शक्ती प्रदर्शन केले.

बाबरी मशिद पतनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर येवून अजान (ajaan) अथवा नमाज पठण (Namaz recitation) करून निदर्शने करू नये किंवा शौर्य दिनाच्या रूपाने कार्यक्रम होवू नये तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Din) देखील गर्दी करू नये असे शासनाचे निर्देश आहे.

करोनाच्या (corona) नव्या ओमायक्रॉन (Omycron) विषाणूचा धोका उभा ठाकल्याने रस्त्यावर जमाव करून गर्दी करू नये, असे आवाहन अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी कायदा हातात घेणार्‍यांची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा शांतता समितीच्या बैठकीत (Peace Committee Meeting) बोलतांना दिला.

मालेगावी 6 डिसेंबर बाबरी मशिद पतनाच्या पार्श्वभूमीवर निषेध दिन (Prohibition day) पाळण्यात येवून रस्त्यावर जमाव जमून अजाण व नमाज पठन करण्याचे प्रकार घडतात. तर पश्चिम भागात शौर्य दिन पाळण्यात येत असल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण होत असते.

गेल्या महिन्यात 12 नोव्हेंबररोजी त्रिपुरातील (Tripura) कथित घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या मालेगाव बंदला सायंकाळी हिंसक वळण लागून संतप्त दंगलखोरांतर्फे जुना आग्रारोड, नवीन बसस्थानक परिसरात प्रचंड दगडफेक (stone pelting) करण्यात येवून बसस्थानकासह दवाखाना व दुकानांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत जाळपोळ केली गेली होती.

दंगलखोरांना हुसकावून लावणार्‍या पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक केली गेल्याने तिघा अधिकार्‍यांसह सात पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तब्बल चार तास सुरू असलेल्या दंगलखोरांच्या या धुडगुसामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिरिक्त पोलीस कुमक पाचारण झाल्यावर दंगलखोरांना पिटाळून लावण्यात यश आल्याने शहरात शांतता प्रस्थापित झाली होती.

त्यामुळे बाबरी मशिद पतन दिनी अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून 2 पोलीस उपअधिक्षक, 8 निरीक्षक, 17 उपनिरीक्षक, 208 पोलीस, 500 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, दंगल नियंत्रण कृती दलाचे 5 पथक असा बंदोबस्त पाचारण करण्यात आला असून शहरात 16 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व 10 व्हीडीओ कॅमेर्‍यांव्दारे लक्ष ठेवले जाणार आहे.

बाबरी मशिद पतन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन शांततेत पार पडावा या दृष्टीकोनातून नियंत्रण कक्षात विविध संघटनांसह शांतता समिती सदस्यांची बैठक अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत विजयानंद शर्मा, उपअधिक्षक लता दोंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

या बैठकीत कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा खांडवी यांच्यासह प्रांत शर्मा यांनी बोलतांना दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर येवून अजाण, नमाज अथवा इतर कार्यक्रम घेण्यास शासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही रस्त्यावर न येता पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे. शहरातील परिस्थितीवर पोलिसांचे पुर्ण नियंत्रण असून बंदोबस्त देखील पर्याप्त आहे. त्यामुळे नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खांडवी यांनी केले.

दरम्यान, 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निषेध करणार्‍या नगरसेवक अतीक कमाल, अय्याज हलचल यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांतर्फे नोटीसा बजावण्यात येवून आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याचे कृत्य केल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी देखील या नोटीसीत देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.