आडगाव
आडगाव
नाशिक

पार्सलच्या बिलावरून हॉटेलमध्ये राडा

आडगाव परिसरातील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जेवणाचे पार्सलच्या बिलावरून झालेल्या वादातून दोन गटांनी हॉटेलमध्ये राडा केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ७) आडगाव परिसरातील ऋतुजा हॉटेल येथे घडला. याप्रकरणी परस्पर विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

राजेंद्र मुरलीधर देशमुख (रा. महालक्ष्मी रो हाऊस, म्हसरूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बंटी मदन भांगरे (२९), दत्ता केशव सरोदे (२९, रा. कुभारवाडा, जुने नाशिक), हर्षल (पुर्ण नाव माहित नाही) व अक्षय शिंदे (रा. जुने नाशिक) हे मंगळवारी रात्री ऋतुजा हॉटेलमध्ये आले. त्यांनी जेवनाचे पार्सल मागीतले.

यावेळी बिलावरून वाद घालत वेटर रवींद्र अशोक जगताप यास शिवीगाळ व मारहाण केली. संशयित बंटी याने चाकू सदृश हत्याराने वेटर रवींद्र वर वार केला. तसेच वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ईश्वर सखाराम घोडे यांच्यावरही हत्याराने वार करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर बंटी मदन भांगरे (२९, रा. कुंभारवाडा, जुने नाशिक) याने संशयित राजेंद्र मुरलीधर देशमुख, ईश्वर घोडे, रवींद्र अशोक जगताप, विशाल वायकंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

जेवनाचे पार्सलच्या बिलावरून वाद घालत संशयितांनी लोखंडी पाइपने मारहाण केल्याचे बंटी याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक गांगुर्डे तपास करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com