नांदगाव पंचायत समिती उपसभापतीपदी
अर्चना वाघ बिनविरोध
नाशिक

नांदगाव पंचायत समिती उपसभापतीपदी अर्चना वाघ बिनविरोध

Sanjay More

Sanjay More

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी आमदार सुहांंस कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अर्चना हेमराज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवसेनेची सत्ता असलेल्या नांदगाव पंचायत समितीचे उपसभापतीपद हे रोटेश पद्धतीने उपसभापती सुशीला नाईकवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाल्यामुळे उपसभापती पदासाठी निवडणुक घेण्यात आली.

यावेळी उपसभापती पदासाठी अर्चना वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी अर्चना वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नामनिर्देशन पत्रासाठी सुचक म्हणून सुमनताई निकम होत्या.

याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलास आहेर, प.स. सभापती भाऊसाहेब हिरे,कृउबा सभापती तेज कवडे, जि.प.सदस्य रमेश बोरसे, प.स.सदस्य विद्याताई पाटिल,सुशिला नाईकवाडे, मधुबाला खिरडकर, सुभाष कुटे, हेमराज वाघ, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे यांची उपस्थिती होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com