वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेस कमान भेट

वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेस कमान भेट

पिंगळवाडे | Pingalwade | संदीप गांगुर्डे

वडिलांच्या आठवणी (Memories) सदैव राहाव्यात व आपले बालपण ज्या शाळेत गेले त्या शाळेचे ऋणनिर्देश करावे या संकल्पनेतून पिंगळवाडे (Pingalwade)येथील शेतकरी कुटुंबातील (farmer family)एका तरुणाने जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) कमान भेट दिली...

येथील रहिवासी सत्यजित भामरे (Satyajit Bhamre) यांनी आपले वडील कै.जगन्नाथ भामरे यांच्या स्मरणार्थ (Remembrance) जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे या शाळेसाठी एक लोखंडी व मजबूत गोलाकार कमान भेट दिली. या कमानीसाठी सत्यजित यांना साधारण वीस हजारापर्यंत खर्च आला. सत्यजित हे शेतकरी व महावितरण विभागात (Department of Mahavitran) कर्मचारी आहेत.

यावेळी सत्यजित म्हणाले की, शाळेसाठी अजून काही द्यावे लागले तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तसेच माझ्या वडिलांनी केलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे. वडिलांच्या संकल्पनेचा मी एक पाईक असून याच नात्याने माझा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सत्यजित भामरेंच्या या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

दरम्यान, याआधी सत्यजित यांच्या वडिलांनी जिल्हा परिषद शाळेत पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली असून ती आजपर्यंत व्यवस्थित आहे. वडिलांचे कार्य लक्षात घेऊन भामरे यांनी शाळेची कमान भेट दिली. सत्यजित यांनी केलेल्या कार्याचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Freedom) दिनानिमित्ताने जिल्हा परिषद शाळेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com