वीजकंपनीच्या मनमानीवर अंकूश लावा; उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

वीजकंपनीच्या मनमानीवर अंकूश लावा; उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरातील वीजपुरवठा (power supply) खाजगी कंपनीतर्फे अवाजवी वीजबिल (electricity bill) आकारणीसह पुर्वसुचना न देता कनेक्शन कट करणे, सक्तीने वीजबिल वसुली (Electricity bill recovery) करणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ग्राहकांशी अरेरावी करणे असा मनमानी कारभार सुरू असल्याने नागरीक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

शासनाने या कारभारावर अंकुश लावावा अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister and Power Minister Devendra Fadnavis) यांना निवेदन (memorandum) देत केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी आ. आसिफ शेख (Former MLA Asif Shaikh) यांनी दिली.

मुंबई (mumbai) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची माजी आ. आसिफ शेख यांनी भेट घेत मालेगाव वीजपुरवठा कंपनीतर्फे (Malegaon Power Supply Company) सुरू असलेल्या मनमानी कारभारासंदर्भात निवेदन सादर केले.

या निवेदनात (memorandum) खाजगी कंपनीतर्फे चार-पाच वर्षापासून वीजपुरवठा (power supply) केला जात आहे. मात्र अवाजवी बिल आकारणीसह पोलीस संरक्षण घेत सक्तीने होत असलेली वीजबिल वसुली पुर्वसुचना न देता वीज कनेक्शन (Power connection) तोडणे आदी प्रकार सुरू झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवाजवी बिल आकारणीमुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: त्रस्त झाली आहे. वाढीव बिलासंदर्भात तक्रार करणार्‍या नागरीकांशी अरेरावी केली आहे. शहरात कधीही वीजपुरवठा खंडीत (Power outage) केला जात असल्याने जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

सुरळीत व अखंडीत वीजपुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून खाजगी कंपनीस वीजपुरवठ्याचा ठेका देण्यात आला होता. मात्र हे दोन्ही उद्देश ठेका देवून साध्य झालेले नसल्याने जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. झोपडपट्टी भागात छापे मारून मिटर काढून घेणे, वीजचोरीचा संशय घेत कुठलीही खात्री न करता रात्रीतून यंत्रमाग कारखान्यात घुसून संबंधितांना त्रास देणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.

शासनासोबत झालेल्या करारांचे उल्लंघन या खाजगी कंपनीतर्फे केले जात असून या कराराची प्रत देण्यासंदर्भात सातत्याने मागणी करून सुध्दा ती दिली जात नाही. व प्रशासकीय संकेत पायदळी तुडवून मनमानी पध्दतीने होत असलेला वीजकंपनीच्या या कारभारावर शासनाने त्वरीत अंकुश लावावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा आसिफ शेख यांनी निवेदनात नमूद केला आहे.

खाजगी वीज कंपनीतर्फे शहरात सुरू असलेला मनमानी कारभार त्वरीत थांबविण्यात यावा यासंदर्भात कपंनीसह अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना देण्यात आले आहे. कारभारात सुधारणा न झाल्यास एक दिवसाचा बंद पुकारून कपंनी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कंपनीची राहिल, असा इशारा देण्यात आला असल्याची माहिती माजी आ. आसिफ शेख यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com