दिंडोरी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मनमानी; सामान्य जनता त्रस्त

दिंडोरी भूमी अभिलेख कार्यालयातील  कर्मचाऱ्यांची मनमानी; सामान्य जनता त्रस्त

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील (Dindori Taluka Land Records Office) कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नसून या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असून कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा बोपेगावचे सरपंच वसंतराव कावळे (Sarpanch Vasant Kavale) यांनी दिला आहे..

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी, की दिंडोरी तालुका भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीची मोजणी तसेच सिटी सर्व्हे उतारे, गट एकत्रीकरण उतारे यासहित शेतजमिनिशी (Farm land) संबंधित अनेक दस्तऐवज मिळणेकामी दुर्गम भागातून खेड्यापाड्यातील नागरिकांची (Citizens) सतत वर्दळ असते. मात्र या कार्यालयातील कर्मचारी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून अक्षरशः मनमानी पद्धतीने कामकाज करत असून त्यामुळे नागरिकांसाठी कार्यालयात लावण्यात आलेली नागरिकांची सनद ही केवळ नावापुरती असल्याची वस्तुस्थिती आहे.

तसेच अनेक वेळा कार्यालयातील कर्मचारी दिवसभर कार्यालयात बसत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन असून दलनासमोर कर्मचाऱ्यांचे नाव व हुद्दा याची माहिती देणारा फलक लावलेला आहे. मात्र, या खुर्च्या व दालन अनेक वेळा दिवसभर कर्मचाऱ्यांच्या विना रिकामे आढळून येते. शिवाय लवकरात लवकर शेतजमीनीची मोजणी करून मिळणेकामी नागरिकांकडून निगमीत फी पेक्षा चौपट जादा फी भरून घेतली जाते. मात्र काम पूर्ण करण्यासाठी चार ते सहा महिने विनाकारण हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते.

तर अलीकडच्या काळात तर चेन्नई- सुरत महामार्गाचे (Chennai-Surat Highway) भूसंपादन सुरू असल्याचे कारण सांगून मोजणी कामी प्रकरण जमा करून घेण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात असून यासंदर्भात अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करून देखील कर्मचारी आपल्या वर्तणुकीत बदल करण्यास तयार नसल्याने तालुक्यातील सामान्य जनता व लोकप्रतिनिधी त्रस्त असून लवकरच या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बोपेगावचे सरपंच वसंतराव कावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

दिंडोरी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनता व लोकप्रतिनिधी त्रस्त असून यासंदर्भात स्थानिक पातळीवर अनेकवेळा तालुका उपअधीक्षक यांच्याकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नसून लवकरच या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात येणार आहे.

वसंतराव कावळे, सरपंच बोपेगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com