सोमवारी कालिदासमध्ये 'अरंगेत्रम'

सोमवारी कालिदासमध्ये 'अरंगेत्रम'

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नृत्याली भरतनाट्यम् अकादमी Nrityali Bharatanatyam Academy प्रस्तुत, सोनाली समीर करंदीकर यांच्या शिष्या निधी जाधव, प्रिया करंदिकर, सायली कदडी आणि आर्या हिरे यांचे ‘अरंगेत्रम’ Arangetram नाशिकमध्ये 20 डिसेंंबर रोजी सादर होणार आहे. अरंगेत्रमची संकल्पना हरिहर म्हणजेच श्री विष्णू आणि भगवान शिव यावर आधारित आहे.

कार्यक्रमाला साथसंगत गायक एन. एन. शिवप्रसाद आणि डॉ. आशिष रानडे, मृदुंंग-सतीश कृष्णमूर्ती, बासरी - अतुल शर्मा, व्हायोलिन साथ सतीश शेषाद्री असे संगीताचार्य देणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता महाजन आणि अलका लजमी उपस्थित राहणार आहेत.

नृत्यांगणांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 20 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com