जलवाहिनी प्रकल्प शेतकरी हिताचा: भुसे

राजकीय द्वेषातून विरोधकांतर्फे अफवा पसरवत योजनेस विरोध
जलवाहिनी प्रकल्प शेतकरी हिताचा: भुसे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

बोरी-अंबेदरी प्रकल्पाच्या (Bori-Ambedari Project) कालव्याऐवजी बंदिस्त जलवाहिनीव्दारे (aqueduct) होणार्‍या पाणीपुरवठ्याचा (water supply) फायदा शेवटच्या गावापर्यंत शेती सिंचनासाठी (Agricultural irrigation) होणार असून गळती होणारे पाणी वाचणार आहे.

पूरपाण्याने बंधारे (dams), पाझर तलावच नव्हे तर शेतकर्‍यांचे (farmers) शेततळे देखील भरून दिले जाईल. लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी वाटप संस्था (Water Distribution Organization) स्थापन करावी. ही योजना या संस्थेस दिली जाईल व शासन नियमानुसार आकारण्यात आलेल्या पाणीपट्टीतील (water tax) 60 टक्के पाणीपट्टी या संस्थेस दिली जाईल.

शेतकरीच (farmers) नव्हे शेतमजुरांसाठी देखील हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीचा केंद्रबिंदू ठरेल, अशी ग्वाही देत पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी राजकीय व्देषासाठी माळमाथ्याची प्रगती होऊ नये, यासाठी काही विरोधकांनी खोट्या अफवा पसरवत प्रकल्पास विरोध सुरू केला असल्याची टीका येथे बोलतांना केली.

येथील बाळासाहेबांची शिवसेना (shiv sena) संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीत (election) बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीत अंबेदरी प्रकल्प क्षेत्रातील लाभार्थी शेतकर्‍यांनी मंजूर जलवाहिनी योजनेचे काम त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी पालकमंत्री भुसे यांच्याकडे केली.

उपस्थित शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मार्गदर्शन करतांना भुसे यांनी योजनेच्या लाभाची माहिती दिली. अंबेदरी प्रकल्पांतर्गत झोडगे, अस्ताने, जळकू, वनपट, लखाने, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, हरणशिखार या गावातील 910 हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मात्र हा कालवा खडकाळ व मुरमाड जमीनीतून जात असल्यामुळे 80 ते 90 टक्के पाणी वाया जात असल्याने सिंचन क्षेत्र कमी होऊन कालव्याच्या शेवटच्या भागातीलक्षेत्र सिंचनापासून वंचित राहत होते.

त्यामुळे कालव्याच्या पाण्याची गळती रोखून शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहचून सिंचन क्षेत्राची पुर्नस्थापना व्हावी यासाठी बंदिस्त जलवाहिनी योजनेची (Aqueduct Scheme) मागणी शेतकर्‍यांतर्फे केली जात होती. या मागणीचा पाठपुरावा करत आपण प्रकल्पास 17 कोटी 85 लाखांचा निधी (fund) देखील मंजूर करून आणला आहे. पाणी उपलब्ध झाल्यास शेतीस फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबर शेतमजुरांना देखील काम मिळून त्यांची प्रगती होऊ शकणार आहे. हा उदात्त दृष्टिकोन लक्षात ठेवूनच आपण ही योजना मंजूर केल्याचे भुसे यांनी सांगितले

जलवाहिनी योजनेस विरोध करत काही शेतकर्‍यांनी आंदोलन (agitation) सुरू केले असता आपण या आंदोलकांबरोबर बैठक घेत त्यांना कशा पद्धतीने पाणी दिले जाईल याची माहिती आपण दिली आहे. जलवाहिनीव्दारे 38 ठिकाणी व्हॉल्वव्दारे पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच बोरी नदी व नाल्याच्या काठावर असलेल्या विहिरींना देखील या पाण्याचा लाभ होईल. 100 विहिरींच्या पाण्यात आज फक्त चार-पाच विहिरी भरत असून उर्वरित पाणी वाया जात आहे. जलवाहिनीमुळे ते इतर शेतकर्‍यांना मिळेल. इतकेच नव्हे पूरपाण्याव्दारे बंधारे, पाझर तलावच नव्हे तर शेततळे देखील भरून दिले जाणार आहे.

झोडग्यापर्यंत पाटकालव्याव्दारे दोन महिन्यांपर्यंत पाणी पोहचत नव्हते. ते जलवाहिनीव्दारे 24 तासात पोहचेल. कालव्याच्या प्रारंभी साडेतीन कि.मी. वनजमीन आहे. शेती नाही त्यामुळे विरोध कां? असा सवाल करत कुणीही शेतकरी (farmers) पाण्यापासून वंचित राहणार नाही अशीच ही जलवाहिनी योजना असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न आहे यात राजकारण नको अशी आपली भुमिका असल्याचे स्पष्ट करत भुसे यांनी आंदोलनाच्या पडद्याचे पाठीमागचे कलाकार समोर आले पाहिजे याची वाट आपण पाहत होतो.

शेतकर्‍यास विष घेण्यास लावले जाते, त्याची शूटींग काढतात हा प्रकार चुकीचा आहे. शेतकरी विष प्राशन करत असतांना त्यास रोखण्याची गरज होती. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. फक्त राजकीय व्देषापोटी शेतकरी, शेतमजुरांची पर्यायाने माळमाथ्याची प्रगती होवू नये यासाठी काही विरोधकांनी खोट्या अफवा पसरून प्रकल्पास विरोध केला असल्याची टीका भुसे यांनी शेवटी बोलतांना केली.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नीलेश कचवे यांनी प्रकल्पाचे महत्व विषद केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय दुसाने, भरत पवार, संजय कदम, प्रदीप देवरे आदींनी भाषणे करत जलवाहिनी योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. बैठकीस अ‍ॅड. आर.के. बच्छाव, झोडगे माजी सरपंच दीपक देसले, कृउबा माजी सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, परेश सोनजे, बाळासाहेब देसले, छगन पवार, भिकन शेळके, सुरेश देसले, अविनाश शिरसाठ, विनोद पवार, प्रविण इंगळे, संजय छरंग, समाधान पवार, सुभाष गिल, केशव पवार, नरेंद्र सोनवणे, गोकुळ सूर्यवंशी, कृष्णा ठाकरे, भगवान मालपुरे, केवळ हिरे, बाळासाहेब पाटील आदींसह मोठ्या संख्येने लाभक्षेत्र गावातील शेतकरी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com