
सिन्नर। प्रतिनिधी Sinnar
जलजीवन मिशन योजनेंतर्गत (Jaljivan Mission) तालुक्यातील 34 गावांंसाठी 46 कोटी 48 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना (Water supply scheme) मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) गावांचे प्रस्ताव बनविण्याच्या सूचना आ. कोकाटे यांनी यापूर्वी केलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) पाणीपुरवठा विभागाकडून (Water Supply Department) गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या सुचना विचारात घेऊन या योजनांसाठी सर्व्हे करून अंदाजपत्रके बनवली गेली होती.
बनवलेल्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी (Technical and administrative approval) देण्याची मागणी कोकाटे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Zilla Parishad Chief Executive Officer Lina Bansod) व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांकडे केली होती. त्यानुसार 34 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना दोन टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. आमदार कोकाटे यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्या दालनात या पाणी योजनांसंदर्भात नुकतीच बैठक घेतली होती.
या बैठकीत त्यांनी ह्या योजनांची कामे करतांना ती ठेकेदारांच्या (contractors) फायद्यासाठी न होता पाण्यासाठी हाल सोसणार्या महिलांना कायमस्वरूपी या कामातून दिलासा मिळेल, याची काळजी घेऊन कामांच्या गुणवत्तेवर करण्याची सूचना केली होती. या योजनांसाठी पाण्याचे स्त्रोत योग्य ठिकाणी घेतल्यास उन्हाळ्यातही पाणी पुरवठा होऊ शकेल. तसेच आवश्यकता भासल्यास उन्हाळ्यात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतून पाणी घेता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी,अशा सूचनाही कोकाटे यांनी उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना केल्या होत्या.
हिवरे (56 लाख 12 हजार), आगासखिंड (79 लाख 85 हजार), कीर्तांगळी (1 कोटी 37 लाख 26 हजार), फुलेनगर (24 लाख 99 हजार), बेलू (32 लाख 94 हजार), कोमलवाडी (89 लाख 2 हजार) व वडगांव सिन्नर (1 कोटी 98 लाख 51 हजार) या 7 गावांची कामे यापूर्वीच निविदेच्या प्रक्रियेत असून लवकरच प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होईल असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या गावांना होणार लाभ
आता नव्याने 27 कामांना प्रशासकीय मंजूर मिळाली आहे. त्यात सरदवाडी (1 कोटी 14 लाख 48 हजार), आशापुरी घोटेवाडी(85 लाख 99 हजार), चिंचोली(2 कोटी 69 लाख 62 हजार), जामगाव (1 कोटी 21 लाख 41 हजार), औंधेवाडी(1 कोटी 7 लाख 46 हजार), धोंडबार (1 कोटी 59 लाख 28 हजार), नायगाव (3 कोटी 42 लाख 12 हजार), जोगलटेंभी (1 कोटी 14 लाख 32 हजार), एकलहरे-कीर्तांगळी (24 लाख 79 हजार),
सांगवी(1 कोटी 2 लाख 77 हजार), पाडळी (1कोटी 13 लाख 31 हजार), ठाणगाव (3 कोटी 10 लाख 47 हजार), दहिवाडी (1 कोटी 57 लाख 12 हजार), कासारवाडी (1 कोटी 34 लाख 66 हजार), मलढोण(85 लाख 67 हजार), दुसंगवाडी-दुशिंगपूर (1 कोटी 61 लाख 82 हजार), शास्त्रीनगर (74 लाख 86 हजार), पिंपळे (67 लाख 91 हजार),
कृष्णनगर-डुबेरेवाडी (1 कोटी 12 लाख 65 हजार), भाटवाडी(1 कोटी 7 लाख 62 हजार), खापराळे-चंद्रपूर (1 कोटी 3 लाख 13 हजार), कोनांबे (1 कोटी 1 लाख 27 हजार), वावी (2 कोटी 50 लाख 26 हजार), पास्ते (1 कोटी 16 लाख 37 हजार), वडगाव पिंगळा (2 कोटी 65 लाख 81 हजार), विंचूर दळवी (2 कोटी 50 लाख 97 हजार) व पांढुर्ली (1 कोटी 69 लाख 96 हजार)