बुद्धविहार बांधकाम, सुशोभिकरणासाठी निधी मंजूर

बुद्धविहार बांधकाम, सुशोभिकरणासाठी निधी मंजूर

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील 9 गावांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Development Scheme) अनुसूचित जाती (Scheduled Castes) वस्तीतील विकास कामांसाठी (development workrs) आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांच्या प्रयत्नातुन 1 कोटींचा निधी मंजूर (Funding approved) झाला आहे. यातून मुख्यत्वे प्रशस्त बुध्द विहारांची (Buddha Viharan) बांधकामांसह सुशोभीकरण होणार आहे.

अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विकास कामे करण्याची मागणी आ. कोकाटेंकडे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातून अनुसूचित जाती वस्तीतील कामे मंजूर होण्यासाठी ना. धनंजय मुंडे यांच्याकडे आ.कोकाटे यांनी मागणी केली होती. राज्य शासनाने नुकतेच या कामांच्या प्रशासकीय मंजुरीचे आदेश दिले आहेत.

कामे मंजूर झाल्याने संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. अनुसूचित जाती वस्तीत गटार, रस्ते ही पारंपरिक कामे वारंवार करण्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण कामे अशा वस्त्यांमध्ये करण्यासाठी आ. कोकाटे यांनी प्रयत्न सुरु केले असून त्याला यश मिळत आहे. मतदार संघात सलग दुसर्‍यांदा एकाचवेळी 6 गावांमध्ये बुध्द विहारांची कामे होत आहेत.

बुध्दविहार बांधकाम व अनुषंगिक कामे करण्यासाठी तालुक्यातील हिवरे, पांढुर्ली, खंबाळे, घोटेवाडी, मर्‍हळ येथे प्रत्येकी 10 लाख तर टाकेद येथे 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या व्यतिरिक्त पंचाळे, नायगाव व चास येथे सामाजिक सभागृहे व अनुषंगिक कामांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. 1 कोटींच्या या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

मागील वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून तालुक्यातील 6 गावांत बौध्दविहारांच्या कामास मंजुरी मिळाली होती. या वर्षीही नव्याने 6 गावांत अशीच कामे होत आहेत. आमदार कोकाटे यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कामे होत असल्याने संबंधित भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सर्व घटकांना न्याय समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे अशीच आपली भूमिका राहिली असून कोरोनामुळे शासनाने विकास कामांवर मर्यादा आणल्या होत्या. आताही शासनाच्या आर्थिक परिस्थितीवर मर्यादा येत असल्या तरी त्यावर मार्ग काढत आपण विकास कामे मंजूर करुन आणत आहोत. या पुढील काळात उर्वरित गावांनाही त्यांच्या गरजांनुसार निधी मंजूर करून आणला जाईल.

माणिकराव कोकाटे, आमदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com