नवीन वीज उपकेंद्रांना निधी मंजूर

नवीन वीज उपकेंद्रांना निधी मंजूर

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यात सुरळीत वीजपुरवठा (Power supply) व्हावा यासाठी चिखलओहोळ व कुकाणे (Chikhalohol and Kukane) येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या दोन नवीन वीज उपकेंद्रांना (Power substation) शासनातर्फे मान्यता मिळून

7.8 कोटी रूपयांच्या निधीस (fund) देखील मंजुरी मिळाली आहे. याबरोबर अजंग, दाभाडी व विराणे वीज उपकेंद्रांची क्षमता वाढ होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला सुरळीत विजपुरवठा (Power supply) होणेसाठी तालुक्यातील चिखलओहोळ व कुकाणे (Chikhalohol and Kukane) येथे नवीन वीज उपकेंद्रांसाठी आपला पाठपुरावा सुरू होता. त्यास यश येवून उपकेंद्रांना मान्यतेबरोबरच 7.08 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून अजंग, दाभाडी, विराणे येथील विज उपकेंद्रांची क्षमतावाढ होणार आहे.

याबरोबरच मालेगांव (malegaon) विभागामार्फत 70 कोटींचा पायाभुत आराखडा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळुन तालुक्यातील वीजपुरवठा संदर्भातील प्रलंबीत कामे मार्गी लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी दिली.

कृषि विकास योजनेचा (agricultural development plan) तालुक्यातील शेतकर्‍यांनी (farmer) मोठ्या प्रमाणात लाभ घेत वीजबिलांचा (Electricity bill) भरणा केला आहे. सदर जमा झालेल्या रक्कमेतुन विज कंपनीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना विजयंत्रणा सुधारणासाठी 30 टक्के निधी (fund) दिला आहे.

चिखलओहोळ व कुकाणे येथील नवीन वीज उपकेंद्रांमुळे वीजेचा प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत होणार असून प्रलंबित कृषिपंपांना (Agricultural pumps) वीजपुरवठा देणे देखील शक्य होणार असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.