महामार्ग दुरुस्तीसाठी निधी मंजूर

आमदार हिरामण खोसकर यांची माहिती
महामार्ग दुरुस्तीसाठी निधी मंजूर

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी शहरातून ( Igatpuri City )जाणार्‍या जुन्या महामार्गाची( Old Highway ) दूरवस्था अनेक वर्षापासून असल्याने हा रस्ता दुरुस्त करावा, ही मागणीसाठी अनेक पक्षांच्या पदाधिकारी, विविध संघटना यांनी रास्तारोको, आंदोलने केली होती. त्याची दखल घेत शासनाने या मार्गाच्या कामासाठी 6 कोटी 30 लाख रुपये मंजूर ( Funds Sanctioned ) केल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar )यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. इगतपुरी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती.

गणपती उत्सव व नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने या रस्त्यावरील पडलेल्या खड्यात तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकुन रस्त्याची डागडुजी करण्याच्या सुचना दिल्याचे आमदार खोसकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

इगतपुरी शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याची झालेली चाळण व खड्डे यामुळे इगतपुरीकर फार त्रस्त झाले होते. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांंमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच पावसाळ्यात खड्यांंमधे साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे.

या रस्त्याने रेल्वे स्टेशन, तालुका न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंंचायत समिती, नगरपरिषद कार्यालये, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विश्व विपश्यना विद्यापीठ केंद्र, विविध शाळा व मुख्य बाजारपेठ आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता दुरुस्त करावा, या मागणीसाठी इगतपुरीवासियांकडून आंदोलन करत होते.

आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत रस्त्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. पत्रकार परीषदेत प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, युवक शहराध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर, माजी नगरसेवक मिलिंद हिरे, प्रवीण कदम, कार्याध्यक्ष दीपक मावरीया, निजाम खान, प्रथमेश पुरोहित आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com