सर्वेक्षण करून प्राधान्याने पाणी योजना मंजूर करा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
सर्वेक्षण करून प्राधान्याने पाणी योजना मंजूर करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील ज्या भागात तीव्र पाणीटंचाई Water scarcity जाणवते,अशा भागाचे सर्वेक्षण करावे, टँकर सदृश्य भागात पाणीपुरवठा सर्वेक्षण Water supply survey in tanker-like areas करून प्राधान्याने तात्काळ योजना मंजूर कराव्यात,अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar यांनी केल्या.

जल जीवन मिशन अंतर्गत विविध विषयांवर नाशिक जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची ऑनलाईन आढावा बैठक डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आढावा बैठकीत बोलताना ना.डॉ.पवार यांनी ज्या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवते अशा भागाचे सर्वेक्षण करून टँकर सदृश्य भागात पाणीपुरवठा सर्वेक्षण करून प्राधान्याने योजना मंजूर कराव्यात. तसेच वर्षानुवर्ष टँकरने पाणी पुरवठा कराव्या लागणार्‍या देवळा सुरगाणा, नांदगाव, मनमाड व इतर भागात पाण्याचे नियोजन करण्याबाबत उपाययोजना कराव्यात असे देखील सूचित केले.

तसेच राजापूर येथील 40 खेडे पाणीपुरवठा योजना ही देखील कृती आराखड्यात घेऊन त्यासाठी लागणारा निधी हा केंद्र शासनामार्फत उपलब्ध निधीतून खर्च करून योजना मार्गी लावणे बाबत देखील यावेळी ना.पवार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com