मनेगाव उपकेंद्र मंजूर करा; आ. कोकाटे यांची महावितरणकडे मागणी

मनेगाव उपकेंद्र मंजूर करा; आ. कोकाटे यांची महावितरणकडे मागणी

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील मनेगाव (Manegaon) परिसराची कमी दाबाने व वारंवार खंडीत होणार्‍या वीजपुरवठयातून (Power supply) कायमची सुटका करण्यासाठी मनेगाव येथे वीज उपकेंद्र (Power substation) मंजूर करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी केली आहे.

सिन्नर तालुक्याच्या (sinnar taluka) दक्षिण भागातील मनेगावसह धोंडवीरनगर, रामनगर, कुंदेवाडी, पाटोळे, आटकवडे, डूबेरे, डुबेरवाडी, लोणारवाडी, भाटवाडी व ढोकी या सर्व गावांतील शेती ग्राहक संख्या 3950, घरगुती ग्राहक संख्या 4900 व औद्योगिक ग्राहक संख्या 150 अशा एकूण 9 हजार ग्राहकांना सिन्नर (sinnar) येथील 132 केव्ही उपकेंद्रांतून वीजपुरवठा (Power supply) केला जातो. सदर उपकेंद्र हे या गावांपासून 15 ते 20 किमीच्या परिघात असल्याने त्यातून होणारा वीजपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत असतो.

शिवाय तो वारंवार खंडित होत असतो. त्यातून विद्युत उपकरणे जळण्याचा तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय रब्बी हंगामात (rabbi season) शेतकर्‍यांची पिके पुरेशा विजपुरावठ्याअभावी करपतात. त्यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच इतर ग्राहकांनाही सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी मनेगाव (manegaon) येथील गट नं. 506 व 507 मध्ये वीजउपकेंद्र (Power substation) मंजूर करण्याची मागणी आ. कोकाटे यांनी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company) यांच्याकडे केली आहे.

वीजउपकेंद्रास शेतकरीहित लक्षात घेऊन मनेगाव ग्रामपंचायत जागा देणार असून त्यासाठी ग्रामपंचायत मालकीचा गट नं. 506 व 507 मधील जागा देण्याचा ठराव ग्रामपंचायतने संमत केला आहे. अनेक ठिकाणी जागांअभावी सार्वजनिक कामे सुरू होऊ शकत नाही. मात्र, काम मंजूर होण्यापूर्वीच मनेगाव ग्रामपंचायतने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शब्दाखातर जागा देण्यास संमती दिल्याने या भागाला सुरळीत वीजपुरवठ्याची नितांत गरज असल्याचे दिसून येते.

तालुक्यातील बहुतांश भाग हा शेतीवर व उद्योगधंद्यांवर अवलंबून असल्याने त्यासाठी सुरळीत वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण विजेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले असून मनेगाव परिसरातील ग्रामस्थांची खंडित व अपुर्‍या वीजपुरवठ्यातुन सुटका करण्यासाठी वीजउपकेंद्र मंजुरीसाठी आपण प्रयत्नशील आहोत.

- माणिकराव कोकाटे, आमदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com