रस्त्याच्या आराखड्यास मान्यता: आ. बनकर

रस्त्याच्या आराखड्यास मान्यता: आ. बनकर
देशदूत न्यूज अपडेट

पिंपळगाव बसवंत । Pimpalgaon Basvant

शेतीमधील कामाकरता आवश्यक असणार्‍या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येणार्‍या पाणंद रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने शेतकर्‍यांना (farmers) आपला शेतीमाल (Agricultural goods) बाजारपेठेत ने-आण करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो.

तसेच हे शेत रस्त्याचा शासनाच्या विविध योजनांमध्ये समावेश होत नसल्याने सदर रस्ते दुरुस्ती (road repair) व्हावे ही शेतकर्‍यांची महत्त्वाची मागणी मान्य करत महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) वतीने राज्यभरात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रमानुसार निफाड तालुक्यातील (niphad taluka) विविध गावांमध्ये सुमारे 100 किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांना सन 2022/23 या वर्षाच्या आराखड्यात मान्यता दिली असून सदरच्या कामांना प्रशासकीय मान्यता पंचायत समिती (panchayat samiti) व जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी दिली आहे. यामध्ये अंतरवेली, आहेरगाव, उंबरखेड, ओणे, करंजगाव, करंजी खु, कारसूळ, कुरुडगाव, कोळवाडी, खेडे, गोंडेगाव, गोरठाण, चाटोरी, चितेगाव, जिव्हाळे, थेरगाव, दात्याणे, दारणासांगवी, दावचवाडी,

नांदुर्डी, नारायणगाव, नैताळे, पंचकेश्वर, पालखेड, पिंपळस, भेंडाळी, मुखेड, म्हाळसाकोरे, रामनगर, वावी, शिरवाडे वणी, शिवरे, साकोरे मिग, सावरगाव, सोनगाव, मौजे सुकेणा, पिपरी, कोठुरे, नांदुरखुर्द, उगाव, नारायणटेंभी, कुंभारी, सुंदरपर, शिवडी, रौळस, कसबे सुकेणे, खानगावथडी, बेहेड, पिंपळगाव ब., सायखेडा, रानवड, सोनेवाडी बु., चांदोरी, कोकणगाव, लोणवाडी, औरंगपुर/श्रीरामपुर, तारुखेडेल, कसबे सुकेणे, देवपूर, दीक्षी, चांदोरी, पिंपळगाव निपाणी आदी गावातील शिवार रस्त्यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.