
पालखेड बंधारा । बापू चव्हाण | Palkhed Dam
दिंडोरी (dindori) ते पालखेड डॅम (Palkhed Dam) या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील असल्याचे बोलले जात आहे.अजूनही याबाबत कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) महत्त्वाचा मानला जाणारा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्याला वाली कोण? असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. झालेल्या मुसळधार (heavy rain) व सतत पडणार्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे (potholes) पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे सांगणे देखील कठीण झाले आहे.
याबाबत दैनिक देशदूत (deshdoot) अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केले असता त्यानंतर नागरिकांच्या समाधानासाठी अनेक वेळा मलमपट्टी करण्यात आली होती परंतु या मलमपट्टीचाही काही उपयोग झाला नसून पावसाने कामांचा दर्जा कसा असतो हे दाखवायचे काम मात्र नक्कीच केले आहे.
तीन ते चार महिन्यापूर्वी दिंडोरी कोराटे या रस्त्याचे काम करण्यात आले मात्र झालेल्या पावसाने याही रस्त्याचे पितळ उघडे पाडले. संबंधित ठेकेदाराने (Contractor) हे काम कसे केले, याचे उदाहरण म्हणजे कोराटे येथील काम झालेल्या या रस्त्यावर खड्डे (potholes) तर पडलेच मात्र अजूनही या रस्त्याच्या साईट पट्ट्या भरल्या नसल्याने वाघ नाल्यामध्ये अपघात होताना दिसत आहे. या साईट पट्ट्याही भरणे आवश्यक आहे. तसेच पालखेड कॉलनी ते मोहाडी रस्त्याचे काम करण्यात आले आहे, याही रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झालेली असून काही ठिकाणी खड्डेही पडले आहे.
या कामा बाबत नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे या कामांची चौकशी होणे ही आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. पालखेडच्या रस्त्याबाबत नागरिकांनी वाहनधारकांनी अनेक वेळा तक्रार देखील केली असता संबंधित खात्याकडून नेहमी उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येतात. सध्या पावसाने उघडीप देऊनही या कामाला सुरुवात झाली नसून हे रस्तेच आता कामाच्या प्रतीक्षेत दिसत आहे.
सध्या दिंडोरी (dindori) नगरपंचायतीकडून (nagar panchayat) शहरातील पालखेड रोडचे मर्यादित असणारे काँक्रिटीकरणाचे काम (Concreting work) सुरू करण्यात आले असून हे काम ठराविकच अंतरापर्यंत केले जात असल्याने त्यापुढील रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम देखील सुरू आहे. परंतु तेही मर्यादितच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. हे काम मर्यादित न ठेवता व नुसते खड्डे न बुजवता संपूर्ण डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र असे असले तरी पुढील काम कधी होणार हे सांगणे मात्र कठीण आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्याने सध्या शेतकर्यांचे (farmers) टोमॅटो खुडणीचे व वाहतुकीचे काम सुरू असून हा शेतीमाल नाशिक, पिंपळगाव बसवंत बाजारपेठ, ओझर व इतर ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात येतो त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा पहावयास मिळतात.असे असताना देखील अजूनही या रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने नागरिकांचे वाहनधारकांचे शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
दोन ते तीन दिवसापासून या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी खडीचे गंज टाकण्यात आले आहे. परंतु अजूनही या कामाला सुरुवात न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याने या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून डांबरीकरण करावे अशी मागणी शेतकरी नागरी वाहनधारक विद्यार्थी करत आहे.
रस्त्यांची पावसामुळे वाताहत झाल्याने या रस्त्यांवर मोठमोठी खड्डे पडले असून वाहनधारकांना व प्रवासी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. वास्तविक पाहता दळणवळणाच्या दृष्टीने तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असल्याने मात्र संबंधित खात्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक वेळा लोकप्रतिनिधी नाही याबाबत तक्रारी करण्यात आले आहे मात्र त्याचाही काहीही उपयोग होत नसल्याने तालुक्यातील जनता नाराज झाले आहे. रस्त्यांमुळे वाहनांची मोठी हाल होत आहे. तरी संबंधित खात्याने व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन या कामांना सुरुवात करावी.
- मोहन गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते पालखेड बंधारा