भगूरसाठी कोविड सेंटर मंजूर

भगूरसाठी कोविड सेंटर मंजूर

दे.कॅम्प। वार्ताहर

भगूर शहरात वाढते कोविड रुण लक्षात घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या झेप फाउंडेशनच्या प्रयत्नातुन व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भगुरला कोविड सेंटर मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व भगूर चे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड गोरखनाथ बलकवडे यांनी दिली.

भगुर शहराची लोकसंख्या 20 हजार पर्यन्त असून येथे शासकीय रुग्णालय नसल्याने नागरिकांची मोठी ग्यारसोय होत असते, प्राथमिक आरोग्य सुविधासाठी नगरपालिकेचा दवाखाना आहे. तर इतर आजारासाठी खासगी दवाखान्यात जावे लागते ते सर्व सामान्यांना परवडत नसल्याने अनेक करोना रुग्ण देवळाली कॅन्टोमेन्ट हॉस्पिटल, तसेच बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर अनेकांना बेड उपलब्ध नसल्याने घरीच राहून उपचार घेत आहेत,

मात्र असे रूग्ण खुले आम शहरात फिरत असल्याने आज रोजी 50 पेक्षा जास्त रुग्ण करोना बाधित आहे, त्यामुळे भगुरला कोविड सेंटर मिळावे याकरिता राष्ट्रवादी महिला जिल्हाअध्यक्ष.प्रेरणा बलकवडे यांनी शासनास प्रस्ताव पाठवुन पाठपुरावा केला त्यानुसार बलकवडे व्यायाम शाळा हॉलमध्ये 50 खाटांचे केद्रास मंजुरी मिळाली आहे. लवकरच हे कोविड सेंटर सुरू होणार आहे, यात भगुर रहिवाशांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.या सेंटर साठी बलकवडे परिवाराने स्वतःची जागा मोफत दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com