9539 कुटुंबांना खावटी अनुदानाची मंजुरी

9539 कुटुंबांना खावटी अनुदानाची मंजुरी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षात खावटी अनुदान योजनेचा लाभ मालेगाव तालुक्यातील 9 हजार 539 अनुसूचित जमातीतील कुटुंबांना मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse )यांनी दिली.

राज्यात करोना corona विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांसमोर उद्भवलेला बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन त्यांना अनुदान स्वरुपात लाभ देण्याच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खावटी अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 2020-21 या आर्थिक वर्षात खावटी अनुदान योजनेचा मालेगाव तालुक्यातील एकुण 9539 अनुसुचित जमातीतील कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे.

आदिवासी कुटुंबियांना (tribal families)खावटी अनुदान मिळावे यास्तव कृषिमंत्री भुसे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. या संदर्भात निर्णय घेतल्याबद्दल आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी ( Tribal Development Minister K. C. Padvi )यांचे त्यांनी आभार मानले आहे.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांना प्रति कुटुंब एकूण 4000 रुपये इतक्या रक्कमेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी 2000 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या बँक, डाक खात्यात थेट रोख स्वरुपात मिळाला असून 2000 रुपये इतक्या किमतीच्या खाद्यवस्तू स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com