करंजवण पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

तांत्रिक मंजुरीचा मार्ग अखेर मोकळा : आ. कांदे
करंजवण पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

मनमाड । प्रतिनिधी

करोनामुळे शासन दरबारी मागे पडलेल्या करंजवन पाणी पुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास बाब म्हणून मंजुरी दिल्याची माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली. खास बाब म्हणून मंजुरी मिळाल्यानंतर शहराच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी करंजवन पाणीपुरवठा योजने पुढे आल्यानंतर सर्व तपासण्या पुर्ण करून योजना तांत्रिक मंजुरीसाठी शासन दरबारी सादर करण्यात आली होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती काहीशी कमकुवत झाली असल्याने कोणत्याही नवीन योजनांवर खर्च करण्यात येऊ नये अथवा नवीन योजना सादर करण्यात येवू नये असा राज्य शासनाने निर्णय घेतला त्यामुळे करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीस अडथळा निर्माण झाला होता.

आमदार सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनमाड शहरातील गंभीर झालेली पाणी समस्या व नागरिकांना गेल्या 35 वर्षापासून होत असलेला त्रास याची माहिती देऊन करंजवन योजनेला शासन 4 मे 20 रोजी जाहीर केलेला निर्णयातून खासबाब म्हणून सूट देण्यात यावी अशी मागणी केली.

मनमाडचा पाणी प्रश्न अजितदादाना माहीत असल्याने त्यांनी आमदार कांदे यांची मागणी मान्य करून करंजवन योजनेला शासन निर्णयातून सूट देण्याचा आदेश दिला, त्यामुळे करंजवन योजनेचा तांत्रिक मान्यतेचा मार्ग आता मोकळा झाला असून सदर योजना लवकरच शासनस्तरावर सादर करण्यात येवून तांत्रिक मंजुरी घेण्यात येणार असल्याची माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com