व्यायामशाळांच्या प्रस्तावांना मंजुरी; निधी मंजूर

व्यायामशाळांच्या प्रस्तावांना मंजुरी; निधी मंजूर

निफाड । प्रतिनिधी | Niphad

निफाड विधानसभा मतदार संघातील (Niphad Assembly constituency) विविध गावाकडून व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे (Construction of gymnasium building), व्यायामशाळा साहित्य (Gym equipment) पुरविणे, ग्रीनजीम साहित्य (Green gym literature) पुरविणे. तसेच क्रीडांगणे विकसित करणे (Developing playgrounds) या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सादर झाले होते.

त्या सर्व 39 प्रस्तावांना जिल्हा वार्षिक योजना सन 2021/22 या योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीस (fund) प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी दिली आहे. तालुक्यातील खेडे येथे व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., सावरगाव व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., शिवडी व्यायामशाळा व साहित्य 5 लाख रु., उगाव व्यायामशाळा साहित्य व इनडोअर व्यायामशाळा साहित्य 10 लाख रु., नादूरखुर्द व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., तामसवाडी व्यायामशाळा साहित्य 5 लाख रु., पिंपळगाव निपाणी व्यायामशाळा साहित्य 5 लाख रु.,

सायखेडा इनडोअर व्यायामशाळा साहित्य 5 लाख रु., महाजनपूर व्यायामशाळा साहित्य 5 लाख रु., कसबे सुकेणे व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., कोकणगाव येथे व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., चाटोरी इनडोअर व्यायाम साहित्य 5 लाख रु., चापडगाव व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., नारायणटेंभी व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., नैताळे/रामपूर येथे व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., पिंपळगाव बसवंत येथे व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रु., शिंपी टाकळी इनडोअर व्यायाम साहित्य 5 लाख रु., श्रीरामनगर इनडोअर व्यायाम साहित्य 5 लाख रु., साकोरे मिग माळोदे वस्ती व बोरस्ते वस्ती येथे इनडोअर व्यायाम साहित्य 10 लाख रु., कारसूळ जिल्हा परिषद शाळा येथे व्यायाम साहित्य 5 लाख रु., निफाड इंग्लिश स्कुल व्यायाम साहित्य 5 लाख रु.,

सोनेवाडी ग्रीन जीम बांधणे 5 लाख रु., रेडगाव व्यायामशाळा बांधकाम करणे, निफाड तालुका क्रीडा संकुल येथे व्यायाम साहित्य 5 लाख रु. याचप्रमाणे क्रीडांगण विकास अंतर्गत सोनेवाडी बु आश्रमशाळेमध्ये क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे 7 लाख रु., सायखेडा महाविद्यालयातील क्रीडांगणावर बास्केट बॉलचे मैदान तयार करणे 7 लाख रु., तामसवाडी जनता विद्यालयात खेळाची क्रीडांगणे तयार करणे तसेच तारेचे कुंपण करणे 14 लाख रु., पालखेड न्यू इंग्लिश स्कुल येथे क्रीडांगणास कुंपण तयार करणे व जिल्हा परिषद शाळेत क्रीडा साहित्य खरेदी करणे 9 लाख 50 हजार रु., शिंपीटाकळी येथे क्रीडांगणास तारेचे कुंपण करणे 7 लाख रु.,

नारायणटेंभी येथे क्रीडांगणास समपातळीत करणे 4 लाख 50 हजार रु., श्रीरामनगर येथे क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे 7 लाख रु., निफाड (niphad) येथे तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा साहित्य खरेदी करणे 3 लाख रु., जिल्हा परिषद शाळा नं.1 येथील क्रीडांगणास तारेचे कुंपण बांधणे व वैनतेय विद्यालयातील क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे आदी कामांसाठी 2 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दिलीप बनकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) तसेच संबंधित अधिकार्‍यांचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.