घोटी पाणीपुरवठा योजनेेच्या कामास मंजुरी

घोटी पाणीपुरवठा योजनेेच्या कामास मंजुरी

घोटी । वार्ताहर Ghoti

घोटीकरांचा पाणीप्रश्न ग्रामपालिकेने Ghoti Grampanchayat सतत केलेल्या पाठपुरव्याने सुटला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेShiv Sena chief. Late . Balasaheb Thackeray यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील Water Supply Minister Gulabrao Patil यांच्या हस्ते मंजुरीचे पत्र घोटी ग्रामपालिकेचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून घोटीसाठी भावली धरणातून पाणी मिळावे यासाठी जलसपदामंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच घोटी पाणीप्रश्न भावली धरणातून मंजूर होण्यासाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या योजनेच्या मंजुरीसाठी माजी आमदार निर्मला गावित यांनीही पाठपुरावा केला होता.

टंचाईच्या काळात 20 ते 25 हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यादृष्टीने गावात भावली धरणातून पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी ग्रामपालिकेने पाठपुरावा केला होता.

घोटी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी माजी ग्रामपालिका सदस्य संतोष दगडे, रामदास शेलार, सचिन गोणके, रामदास भोर, संजय आरोटे यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर झाली असून लवकरच गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल.

यावेळी सरपंच गणेश गोडे, उपसरपंच अरुणा जाधव, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, संजय जाधव, रवींद्र तारडे, भास्कर जाखेरे, स्वाती कडू, रूपाली रुपवते, वैशाली गोसावी, सुनंदा घोटकर, अर्चना घाणे, कोंड्याबाई बोटे, सुनीता घोटकर, मंजुळा नागरे यांच्यासह शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com