पिंपळगाव सोसायटी सभासदांना लाभांश वाटपास मान्यता

पिंपळगाव सोसायटी सभासदांना लाभांश वाटपास  मान्यता

पिंपळगाव बसवंंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीसह जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या (Joint Farming Society) सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप (Dividend distribution) करण्याच्या निर्णयास संचालक मंडळाच्या मान्यता देण्यात आली आहे.

दीपावलीचे (diwali) औचित्य साधत शुक्रवार (दि.14) पासून या दोन्ही संस्थांच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही सोसायटीच्या सभासदांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पिंपळगाव सोसायटी सभागृहात विविध कार्यकारी सोसायटीसह जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या सभासदांना लाभांश वाटपप्रसंगी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, सोसायटी चेअरमन विनायक खोडे, व्हा. चेअरमन सोमनाथ मोरे, जॉईंट फार्मिंग सोसायटी चेअरमन साहेबराव डेरे, व्हा. चेअरमन राहुल बनकर, अ‍ॅड. शांताराम बनकर, पंढरीनाथ देशमाने, दिलीप मोरे, सुरेश खोडे, सतीश मोरे, साहेबराव मोरे, संपत विधाते, भीमराव मोरे, बाळासाहेब बनकर, सोमनाथ मोरे, संपत मोरे, दिलीप देशमाने,

चंद्रकांत खोडे, देशमाने, सुधाकर मेंगाने, गुलाब मोरे, संजय वाघ, बाळासाहेब विधाते, भास्कर मोरे, आनंद बनकर, गणपत विधाते, रामराव डेरे, चंद्रकांत बनकर, दत्तात्रय देवकर, नंदू देशमाने, अनिल बनकर, आशिष बागूल, अशोक भवर, अशोक विधाते, विश्वास बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध कार्यकारी सोसायटीच्या (Various Executive Societies) 1234 सभासदांपैकी 35 तर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या 501 सभासदांपैकी सभासदांना (members) प्राथमिक स्वरूपात लाभांशाचे वितरण (Distribution of Dividends) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर उर्वरित सभासदांना दिवाळीपूर्वीच (diwali) लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. सोसायटीच्या या निर्णयाचे सभासदांनी संचालकांचे आभार मानले आहे.

जॉईंट फार्मिंग चांगली कामगिरी करेल विविध कार्यकारी सोसायटीसह जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या (Joint Farming Society) सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करण्याच्या निर्णयास संचालक मंडळाने मान्यता दिल्याने दिवाळीपूर्वीच लाभांश वाटप करण्यात आला. विविध कार्यकारी सोसायटीच्या तुलनेत जॉईंट फार्मिंग सोसायटीचा लाभांश कमी असल्याने ही परिस्थिती बदलण्यासाठी सोसायटीप्रमाणेच जॉईंट फार्मिंग सोसायटी देखील पुढील काळात देदीप्यमान कामगिरी करून उत्पादनाचे स्त्रोत वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून सभासदांचे हिताला सर्वाधिक प्राधान्य देवून संस्थेची प्रगती देखील साधली

- भास्कर बनकर, ज्येष्ठ नेते (पिंपळगाव बसवंत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com