मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांना मंजुरी

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांना मंजुरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिकेच्या Nashik Municipal Corporation स्थायी समितीच्या बैठकीत standing committee meeting सुमारे दहा कोटी रूपयांच्या विकासकामांना Devlopment work विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाही विकासकामांबाबत चर्चा न करता थेट सभापतींनी सर्व विषय मंजूर केले.

स्थायी समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच विषय पत्रिकेवर असलेल्या सुमारे दहा कोटी रुपयांच्या कामांबरोबरच जादा विषयांना मंजूरी देण्यात येत असल्याचे सभापतींनी सांगितले. स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर यंदा सर्वाधिक विकासकामे दिसून आली आहे.

काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या विकासकामांना आढकाढी न करता मंजूरी देण्यात आली आहे. सदस्या समीना मेमन यांनी शहरात साथीच्या रोगाचे रुग्ण वाढत असतांना प्रशासन आता शहरात सर्वेक्षण करत आहे. महापालिकेने कोट्यावधी रूपयांचा पेस्ट कंट्रोलचा ठेका दिलेला असतांना संबंधित ठेकेदार काम का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला.

ठेकेदारावर आरोग्य विभागाचे नियंत्रण नसल्याचा आरोप त्यांनी केला. नवीन नाशिकच्या उड्डाणपुलावरून अनेक दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत वाद सुरु असतानाच आज भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी या उड्डाणपुलाच्या सल्लागार नेमणूकीबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्थायी समितीच्या सभेत सांगितले. अधिकार्‍यांनी स्वार्थापोटी अनुभव नसलेल्या सल्लागाराची नेमणूक केली असल्याचा आरोप केला.

नाशिक शहरातील महानगर पालिकेच्या शाळेत कामाठीच कार्यरत नाही. तसेच सध्या शाळा सुरु नसल्या तरी शिक्षक शाळेत जात असून त्यांना शाळेची स्वच्छता ठेवण्याची वेळ आली असून शिक्षण विभाग या गोष्टीकडे लक्ष का देत नाही, असा प्रश्न नगरसेवक सलीम शेख यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com