खुशखबर! 'सारथी'चे केंद्र नाशिकमध्ये; मागासवर्गीयांना होणार 'असा' फायदा

खुशखबर! 'सारथी'चे केंद्र नाशिकमध्ये; मागासवर्गीयांना होणार 'असा' फायदा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) पुणे (Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI) या संस्थेचे केंद्र नाशिकमध्ये उभारणीस मान्यता मिळाली आहे....

शहरातील त्र्यंबकरोडवरील (Trimbak Road) पंचायत समिती कार्यालयाजवळील (Panchayat Samiti Office) सर्व्हे १०५६, १०५७ (१) मध्ये भोगवटा वर्ग २ ची जागा या केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तब्बल ०.६० हेक्टर म्हणजेच ६ हजार चौरस मीटर जागेवर हे केंद्र उभारले जाणार आहे.

खुशखबर! 'सारथी'चे केंद्र नाशिकमध्ये; मागासवर्गीयांना होणार 'असा' फायदा
Video : मॅरेथॉन चौकात झाड कोसळले

या जागेवर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. पुणे केंद्रात सुरू असलेले कौशल्य विकाससह इतर विविध प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षणदेखील येथे दिले जाणार आहे.

खुशखबर! 'सारथी'चे केंद्र नाशिकमध्ये; मागासवर्गीयांना होणार 'असा' फायदा
नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

यामुळे नाशिक महसूल विभागातील नाशिक (Nashik), धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Ahmednagar) आणि नंदूरबार (Nandurbar) या पाच जिल्ह्यांतील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या केंद्रात (Pune Center) जाण्याची आता गरज भासणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com