कर्तव्यदक्ष महिला पोलीस सरला खैरनार यांच्या कामगिरीचे कौतुक

कर्तव्यदक्ष महिला पोलीस सरला खैरनार यांच्या कामगिरीचे कौतुक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात गेल्या महिनाभरात खुनाच्या ( Murder ) घटनांचे सत्र सुरु आहे. त्यात कालच झालेल्या आनंदवली ( Aanandvali) येथील पाइपलाइन रोडजवळ कॅनॉलरोडलगत पवन पगारे याच्यावर चाकुने वार होऊन त्याची हत्या झाली. हा आरोपी अतुल अजय सिंग हा खून करुन हातात रक्ताने माखलेला धारदार चाकू घेऊन युवक पळत होता. त्याचवेळी गंगापुर पोलिस ठाण्यात कर्तव्यदक्ष महिला पोलीस सरला खैरनार (woman police Sarla Khairnar )यांनी पाठलाग करुन संशयिताकडून चाकू हिसकावत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

या कामगिरीबद्दल खैरनार यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे. प्रभागाचे नगरसेवक व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी खैरनार यांचे अभिनंदन करताना प्रशंसोद्गार काढले. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख, बागुल, संकेत घोलप, राजू सिद्धू, राहुल उन्हाळे, अनिल पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

भाजपच्या वतीने आ. सीमा हिरे यांनी खैरनार यांना शाबासकीची थाप आणि पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सरला खैरनार यांचे पती विजय खैरनार व संपूर्ण परिवार उपस्थित होता. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रियाज शेख, माजी नगरसेविका हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश हिरे, भगवान काकड, नारायण जाधव, पुर्वा सावजी, रामहरी संभेराव, रोहिणी नायडू, अनिल भालेराव आदींसह महिला व पुरुष पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com