बस वाहकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

बस वाहकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

निर्‍हाळे । वार्ताहर Nirhale

सिन्नर बस आगारातील ( Sinnar Bus Depot ) वाहक नीलेश परदेशी ( Bus Conductor Nilesh Pardeshi ) यांनी भाऊबीजेच्या दिवशी बसमध्ये पडलेली पैशांची पर्स माहेरवाशिणीला परत केल्याने परदेशी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सिन्नर आगरातून 10 वाजता निघणारी सिन्नर ते लासलगाव बस ओवाळीनिमित्ताने प्रवाशांनी गच्च भरलेली होती. बस सिन्नर येथून निघून लासलगाव येथे रिकामी झाली. रिकामी बस चेक करणे ही परदेशी यांची नित्याचीच सवय असल्याने बस चेक करत असताना त्यांना एक लाल रंगाची पर्स सिटाच्या खाली सापडली. परदेशी यांनी पर्स उघडून बघितली असता त्यांना पर्स पैशाने भरलेली आढळली.

पर्समध्ये पैशाशिवाय काहीच नव्हते. आता पर्स द्यायची कुणाला हा प्रश्न परदेशी यांना पडला. तेवढ्यात चालक नारायण सानप यांनी ते पैसे किती आहेत मोजून बघण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे वाहक नीलेश परदेशी यांनी नोटा बाहेर काढून मोजू लागले तोच त्यात एक पांढरा कागदाचा तुकडा निघाला ज्यावर मोबाईल नंबर होता.

ते पाहून वाहक नीलेश परदेशी यांनी त्या नंबरवर संपर्क साधला असता प्रशांत केदार, हिवरगाव येथे फोन लागल्यावर समजले की, कल्याण येथील जनाबाई आंधाळे ही महिला आपल्या भावाला ओळवण्यासाठी हिवरगाव येथे लासलगाव बसने प्रवास केला. त्यावेळी पर्स बसमध्ये पडली. नंतर परतीच्या प्रवासात हिवरगाव येथे आल्यावर जनाबाई आंधाळे यांना त्यांची पर्स व पाच हजार रुपये रोख त्यांच्या स्वाधिन केले.

यावेळी चालक नारायण सानप, वाहक नीलेश परदेशी यांचे ओवाळीच्या दिवशी माहेरवाशीण जनाबाई आंधळे व प्रवाशांनी अभिनंदन केले. सिन्नर आगरातही परदेशी व सानप यांचे आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, आगारप्रमुख सुरेश दराडे, देवा सांगळे, दया बैरागी यांनी कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com